बुलडाणा - जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी रजिस्ट्रार कार्यालयात जावे लागते. मात्र, चिखली येथील दुय्यम उपनिबंधक अधिकारी कळसकर पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. याचा संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारत मनसे जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी उपनिबंधकांना चांगलाच चोप दिला. यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा - हिंगोलीत पोलीस अधीक्षकांसमोर अवैध दारू विक्रेत्यांची धुलाई
कळसकर या अधिकाऱ्याच्या जाचाला असंख्य शेतकरी वैतागले होते, असे सांगण्यात येत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकड़ून पैसे घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. याचा त्याला जाब विचारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन कार्यालय गाठले आणि त्यांनी या अधिकाऱ्याला जाब विचारला. यानंतर या अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तेव्हा मनसे जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी उपनिबंधकांना चांगलाच चोप दिला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा - अर्णब प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकील मांडणार म्हणणे