ETV Bharat / state

MLA Dhiraj Lingade Alleges BJP: आमदार लिंगाडेंची मते कव्हर करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना खोक्याची ऑफर; लिंगाडेंचा गौप्यस्फोट

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या दीर्घ काळ चाललेल्या मतमोजणीदरम्यान भाजपने अवैध ठरलेल्या मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली. त्यावेळी मला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचे सांगून कोणत्याही परिस्थितीत मतमोजणीचे टेबल सोडून जाऊ नका, कारण लिंगाडेची जी मते मिळाली होती तो फरक कव्हर करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना खोक्याची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे तेथून हालायचे नाही... असा आदेश नानाभाऊ यांनी दिला होता. आमदार धीरज लिंगाडे यांनी हा गौप्यस्फोट करून एकच खळबळ उडवून दिली.

MLA Dhiraj Lingade Alleges BJP
आमदार लिंगाडे
author img

By

Published : Feb 5, 2023, 3:46 PM IST

आमदार लिंगाडे

बुलडाणा: अमरावती मतदारसंघात एकूण पाच जिल्हे असून अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे. या जागेसाठी एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. तसेच २ लाख ६ हजार १७२ मतदार असून मतदान हे १ लाख २ हजार ४०३ इतके झाले. त्यात ८ हजार ३८७ मते अवैध ठरली. ९४ हजार २०० मते वैध ठरली. मतांचा कोटा ४७ हजार १०१ इतका असून तो कुणीही गाठू शकले नाही. त्यामुळे सुरुवातीला अवैध ठरलेल्या मतांचे फेर अवलोकन मागणीवरुन या मतांची फेरमोजणी झाली. अखेर मतांचा कोटा कुणीही पूर्ण करू शकले नसल्यामुळे ज्यांना जास्त मते त्यांना विजयी केले. धीरज लिंगाडे (महाविकास) यांना ४६ हजार ३४४ तर डॉ. रणजीत पाटलांना (भाजप) ४२ हजार ९६२ मत मिळाली आहेत. तर उर्वरित उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मत घेतल्याने पाटलांना फटका बसला. अन् लिंगाडेंनी ३ हजार ३८२ मतांनी आघाडी घेत बाजी मारली. दरम्यान, मतमोजणीसाठी २८ टेबलांची व्‍यवस्‍था आणि २८ पथकांची नियुक्‍ती होती.

कमी मतदानाचा फटका : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची आकडेवारी तब्बल १३.०५ टक्के घसरली. अमरावती विभागात ४९.६७ टक्के मतदान झाले असून २०१७ च्या निवडणुकीत ६३.५० टक्के मतदान झाले होते. या कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फटका डॉ. रणजीत पाटलांना बसला. कारण, यंदा अमरावती विभागातील ५८.८७ टक्के हे सर्वाधिक मतदान यवतमाळ जिल्ह्यात झाले. तर अमरावतीमध्ये ४३.३७ टक्के, अकोलामध्ये ४६.९१ टक्के, बुलडाणामध्ये ५३.०४, वाशिम ५४.८० टक्के मतदान झाले होते.

धीरज लिंगाडे यांची पार्श्वभूमी : धीरज लिंगाडे यांचा परिवार हा राम लिंगाडेंपासून काँग्रेस विचारांचा राहिलेला आहेत; पण मध्यंतरीच्या काळात धीरज लिंगाडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून काही काळ बुलडाणा शिवसेना जिल्हाप्रमुख सुद्धा काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे लिंगाडे कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना या आघाडीतील सर्व मित्र पक्षांची लिंगाडे यांचे जिव्हाळ्याचे संबंधही त्यांची जमेची बाजू आहे. दरम्यान लिंगाडे पदवीधरांच्या समोर अनेक अजेंडा घेऊन निवडणुकीत समोरे गेले अन् दणदणीत विजय मिळवला.

हेही वाचा : UP Crime News : बलात्कार करायला आलेल्या नराधमाच्या ओठाचा लचकाच तोडला, पाकिटात टाकून दिला पोलिसांकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.