बुलडाणा - सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) मृत्यू झाला. हा अपघात की त्यांचा कोणी घात केला याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी शंका उपस्थित केली. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पहुरपुर्णा येथे एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
- अपघात की घातपात? - मिटकरी
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्यावतीने शनिवारी शेगाव तालुक्यातील पहुरपुर्णा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमामध्ये आमदार मिटकरी उपस्थित होते. सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर साधंसुधं हेलिकॉप्टर नव्हतं. त्यामुळे या घटनेमध्ये एखादे षड्यंत्र तर नसावे ना अशी शंका आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली.
तामिळनाडुतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य 11 जणांचा मृत्यू झाला होता. या सर्वांवर शुक्रवारी (10 डिसेंबर) अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.