ETV Bharat / state

डॉ. आशिष अग्रवाल यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बुलडाण्यात एमआयएमचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण - बुलडाण्यात एमआयएमचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

खामगाव येथील डॉ. आशिष अग्रवाल यांच्या विरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून डॉ. अग्रवाल यांचे रुग्णालय कायमचे बंद करावे, या मागणीसाठी एमआयएमच्या खांमगाव शहर शाखेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.

डॉ. आशिष अग्रवाल यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी एमआयएमचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

author img

By

Published : Aug 3, 2021, 5:50 PM IST

बुलडाणा - खामगाव येथील डॉ. आशिष अग्रवाल यांच्या विरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून डॉ. अग्रवाल यांचे रुग्णालय कायमचे बंद करावे, या मागणीसाठी एमआयएमच्या खांमगाव शहर शाखेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.

डॉ. आशिष अग्रवाल यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बुलडाण्यात एमआयएमचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

'मान्यता नसतांना केले कोरोना रुग्णांचे उपचार'

मागील दिड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. कोरोनाग्रस्त झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक खासगी रुग्णालयांना कोविड सेंटरची मान्यता दिली आहे. परंतु, खामगाव येथील डॉ. आशिष अग्रवाल यांच्या लाईफलाईन हॉस्पीटलला कुठल्याच प्रकारची मान्यता नसताना त्यांनी कोरोनाचे रुग्ण दाखल करून, त्यांच्यावर उपचार केले आहेत. ज्यामध्ये 14 रेमडीसीवर इंजेक्शन देण्यात आले. त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे अनेक रुग्णांचे जीव गेले आहेत, असे चौकशी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे त्यांचे रुग्णालय कायमचे बंद करून, त्यांच्या विरुध्द मनुष्य वधाचा गुन्ह दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी एमआयएमचे खामगाव शहराध्यक्ष, मोहम्मद आरिफ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.