ETV Bharat / state

जिल्ह्यात 21 ऑगस्टपर्यंत दुपारी 3 ते सकाळी 9 वाजेपर्यंत लॉकडाऊन; शनिवारी व रविवारी संचारबंदी - सुमन चंद्रा न्यूज

लॉकडाऊनमध्ये दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत दूध, वर्तमानपत्र वितरण आदी वगळता संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक संचारबंदी लागू असणार आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करणार आहे.

Buldana lockdown news
बुलडाणा लॉकडाऊन न्यूज
author img

By

Published : Jul 22, 2020, 3:20 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 21 जुलै ते 21 ऑगस्ट या काळात दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. प्रत्येक शनिवार व रविवारी या दोन्ही दिवशी संचारबंदी लागू राहणार असून औषधालय, दवाखाने व दूध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी मंगळवारी जारी केले.

लॉकडाऊनमध्ये दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत दूध, वर्तमानपत्र वितरण आदी वगळता संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक संचारबंदी लागू असणार आहे. तसेच राज्य शासनाच्या 1 जुलैच्या आदेशामध्ये ज्या बाबी बंद राहतील, असे नमूद केले आहे. त्या बाबी 31 जुलैपर्यंत तशाच बंद राहतील. दवाखाने, औषधालय, वैद्यकीय तसेच अत्यंत आवश्यक कामासाठी बाहेर पडणारे नागरिक,आंतरजिल्हा वाहतूक / पासधारक वाहने व मालवाहतूक सुरू राहील. शहराच्या हद्दीबाहेरील सर्व पेट्रोलपंप 24 तास सुरू राहतील.

या काळात अत्यावश्यक असणाऱ्यांनीच बाहेर पडावे. विनाकारण कुणीही बाहेर फिरू नये. सर्वांनी चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रुमाल वापरावा. अन्यथा दंड आकारण्यात येईल. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार संचार करण्यास मुभा राहील. मात्र ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन व्यक्तींमध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. जिल्ह्यामध्ये संचार करण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात येत असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी इंसिडेंट कमांडर यांची परवानगी आवश्यक असणार आहे.

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभाग कारवाई करणार आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तू देणाऱ्या वाहनांवर पासेस, स्टीकर्स वाहनावर लावणे आवश्यक आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये, साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये संबंधीतांवर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.