ETV Bharat / state

बुलडाणा; नकली सोने तारण ठेवून जिजामाता सहकारी बॅंकेला 28 लाखांचा चुना - नकली सोने तारण बातमी बुलडाणा

बुलडाणा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेतून 2 वर्षा अगोदर 10 कर्जदारांनी सोने तारणवर 16 कर्ज प्रकरण करून जवळपास 28 लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जात नियमित भरणा न केल्यामुळे कर्जदारांना वेळो-वेळी भरणा करण्यासाठी बॅंकेतून नोटीस देण्यात आली.

jijamata-womens-co-operative-bank-fraud-by-10-gold-mortgage
नकली सोने तारण ठेवून जिजामाता सहकारी बॅंकेला 28 लाखांचा चुना
author img

By

Published : Dec 16, 2019, 8:05 PM IST

बुलडाणा - सोनेतारण कर्ज प्रकरणात बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेला सोने तारण कर्ज प्रकरणात 28 लाखांचा चुना लावण्यात आला आहे. 10 कर्जदारांनी नकली सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. याप्रकरणी 6 जणांना अटक केली आहे. तर 5 जण फरार आहेत.

नकली सोने तारण ठेवून जिजामाता सहकारी बॅंकेला 28 लाखांचा चुना

हेही वाचा- मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बुलडाणा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेतून 2 वर्षा अगोदर 10 कर्जदारांनी सोने तारणवर 16 कर्ज प्रकरण करून जवळपास 28 लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जात नियमित भरणा न केल्यामुळे कर्जदारांना वेळो-वेळी भरणा करण्यासाठी बॅंकेतून नोटीस देण्यात आली. मात्र, तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तारणांवर ठेवलेल्या सोन्याची तपासणी करण्यात आली. यावेळी सोने नकली असल्याचे उघड झाले. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक दिपक अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार दिली. दिपक वर्मा या कर्मचाऱ्याने या सोन्याला असली असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. याप्रकरणी दिपक हरीश वर्मा, संजय शंकर मठारकर, मोहन खरात, मनोहर श्रीराम सावळे, कैनियालाल बद्री नारायण वर्मा, प्रविण रमाकांत वाडेकर यांना अटक करण्यात आले आहे. तर 5 आरोपी फरार आहेत. अटक आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुण्यावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक अमित जाधव अधिक तपास करीत आहेत.

बँकेतील सोने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने तारण ठेवलेले सोने असली असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेत सोने तपासणारा दिपक वर्मा हा कर्मचारी बुलडाणा अर्बन पतसंस्थेत देखील नोकरीवर होता. त्यामुळे बुलडाणा अर्बन पतसंस्थेतून ही अशा प्रकारे नकली सोन्यावर कर्जाचे प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे.

Intro:Body:बातमी पैकेज लावावी..विश्वास सरांना कल्पना दिलेली आहे..

स्टोरी:- बैंकेतून नकली सोन्यावर घेतले कर्ज,बँकेतील सोने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याचे आरोपीत समावेश,फसणुकीचे गुन्हे दाखल,6 आरोपी अटक,6 फरार; ..

बुलडाणा:- बैंकेतून अति तात्काळ कर्ज कोणत्या योजनेतून मिळत असतील तर सोने तारण वर मात्र बुलडाण्यात सोनेतारण कर्ज प्रकरणात बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलंय.जिजामाता महिला नागरी सहकारी बैंकेला सोने तारण कर्ज प्रकरणात 28 लाखांचा चुना लावण्यात आलंय 10 कर्जदारांना 16 कर्ज प्रकरणात नकली सोने तारण करून कर्ज घेतले आहे.विशेष म्हणजे बँकेतील सोने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने नकली सोन्याला असली असल्याचे प्रमाणपत्र असल्याचे दिल्याचे समोर आलेय प्रकरणी शाखा व्यवस्थापक दिपक अग्रवाल यांच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी 10 कर्जदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले असून सध्या बँकेतील सोने तपासणी करणारा दिपक वर्मा नामक कर्मचाऱ्यासह 6 आरोपींना अटक केले आहे.तर जिजामाता महिला नागरी सहकारी बैंकेत सोने तपासणारा दिपक वर्मा हा कर्मचारी बुलडाणा अर्बन पतसंस्थेत नोकरीवर होता म्हणून बुलडाणा अर्बन पतसंस्थेतून ही अश्या प्रकारे अश्याच टोळीने नकली सोन्यावर कर्ज प्रकरण बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बैंक आणि पतसंस्थेतून सोनेतारण कर्ज हे ठेवीदारांच्या ठेवीतून देण्यात येते यामुळे अश्या नकली सोण्यावर कर्जप्रकारण होत असल्याचे समोर आल्याने ठेवीदारांचे ठेवी किती सुरक्षित आहे.असे प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

बुलडाणा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी बैंकेतून 2 वर्ष अगोदर 10 कर्जदारांनी सोने तारणवर 16 कर्ज प्रकरण करून जवळपास 28 लाखांचे कर्ज घेतले होते.या कर्जात नियमित भरणा न केल्यामुळे कर्जदारांना वेळो-वेळी भरणा करण्यासाठी बैंकेतून कर्जदारांना नोटीसा देवून, फोनद्वारे, प्रत्यक्ष भेटून सांगण्यात आले तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तारणांवर ठेवलेल्या सोन्याची तपासणी केल्यानंतर सदर सोने नकली असल्याचे आढळले विशेष म्हणजे बैंकेत सोने तपासणारा दिपक वर्मा नामक कर्मचाऱ्याने नकली सोन्याला असली सोने असल्याचे प्रमाणपत्र असल्याचे दिलेले आहे.प्रकरणी शाखा व्यवस्थापक दिपक अग्रवाल यांनी बँकेची फसवणुक केल्याची तक्रार बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केल्याने सोने तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यासह 10 आरोपींवर 420,468,472,34 भांदवी नुसार गुन्हे दाखल करून सोने तपासणारा दीपक हरीश वर्मा, संजय शंकर मठारकर,मोहन खरात ,मनोहर श्रीराम सावळे , कैनियालाल बद्री नारायण वर्मा, प्रवीण रमाकांत वाडेकर यांना अटक करण्यात आले असून 5 आरोपी सध्या फरार आहे.अटक आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव करीत आहे.वसीम शेख इटीव्ही भारत बुलडाणा..

बाईट:- 1) अमित जाधव, पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी,बुलडाणा

2) दिपक अग्रवाल,शाखा व्यस्थापक जिजामाता महिला नागरी सहकारी बैंक बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.