बुलडाणा- जिल्ह्यात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. यापुढे मी जोपर्यंत पालकमंत्री आहे तोपर्यंत जिल्ह्यात गुटखा विक्री, जुगार, मटका, अवैध दारू विक्री यासारख्या अवैध धंद्यांना थारा मिळणार नाही, अशी स्पष्टोक्ती अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली. चिखली येथील नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा- जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर परदेशी पथक, युरोपियन संघातील सदस्यांचाही समावेश
यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्या व त्यांना साथ देणाऱ्या संबधित कर्मचारी, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.