ETV Bharat / state

अरेरेरे... सासरकडून जावयाला ही असली-कसली मारहाण - Javaya, who went to fetch his wife, was beaten

पत्नीला नेण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय पतीला सासरीकडील मंडळीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे घडला आहे. यामध्ये जावयाच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले टाकून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

बोपाऱेडी पोलीस स्टेशन
बोपाऱेडी पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jul 10, 2021, 7:23 PM IST

बुलडाणा - पुण्याहून पत्नीला नेण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय पतीला सासरीकडील मंडळीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे घडला आहे. यामध्ये जावयाच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले टाकून मारहाण केल्याचा प्रकार समोर आले आहे. याबाबत जावयाने बोरखेडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. दरम्यान, सासरकडील 11 जणांवर गुरुवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात जावयाला सासरीकडील मंडळीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्राल दाखल केल्यानंतर, घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना मोताळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अशोक रोकडे

काय आहे प्रकार?

पुणे जिल्ह्यातील जुन्नर कबाडवाडी येथील २२ वर्षीय पीडित विवाहित युवक हा त्याच्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी ४ जुलैला बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कॉटन मार्केटजवळच्या परिसरात आला होता. यावेळी मोताळा येथील रहिवासी आरोपी रामराव भाऊराव पवार, विजय रामराव पवार, रवी रामराव पवार, राजू रामराव पवार, विकास सर्जेराव पवार, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेवाबाई, कलुबाई व देवानंद रामभाऊ मोहिते या ११ जणांनी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पीडित युवकाचे हातपाय दोरीने बांधून अंगणात बांधून ठेवले. दरम्यान, पीडित युवकाच्या अंगातील कपडे काढून त्याच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले घातले. शिवाय शिवीगाळ करून त्याला लाथाबुक्क्यांनी, केबलच्या वायरने पाठीवर व कंबरेवर अमानुषपणे मारहाण केली. अशी, तक्रार पीडित युवकाने बोरखेडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पीडित युवकाच्या तक्रारीवरून ११ आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ४ लोकांना अटक करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे करत आहेत.

'जावई आणि सासरच्या लोकांमध्ये होता वाद'

या युवकाचे मोताळा येथील रामभाऊ भाऊराव पवार यांच्या मुलीशी मे २०२० मध्ये लग्न झाले आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन महिन्यांपासून पीडित युवक आणि त्याच्या पत्नीचे वाद सुरू होते. या वादामुळे ती मोताळा येथे आपल्या माहेरी राहत आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी पीडित युवकाने सासरीकडील मंडळीसोबत वाद केले होते.

'१२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी'

पीडित पतीला मारहाण केल्या प्रकरणी सासरसह तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चौघांना सोमवारी १२ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.