ETV Bharat / state

'हमाली हाताळनुकीच्या निविदा उघडण्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाणीवपूर्वक उशीर'

जिल्ह्यातील शासकीय स्वस्त धान्य गोडाऊनमधील हमाली कामाच्या हाताळनुकीची निविदा उघडण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाणीवपूर्वक तीन महिन्यांपासून उशीर करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

buldana
'हमाली हाताळनुकीच्या निविदा उघडण्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाणीवपूर्वक उशीर'
author img

By

Published : Mar 19, 2020, 5:13 PM IST

Updated : Mar 19, 2020, 5:28 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील शासकीय स्वस्त धान्य गोडाऊनमधील हमाली कामाच्या हाताळनुकीची निविदा उघडण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाणीवपूर्वक तीन महिन्यांपासून उशीर करण्यात येत आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने निविदा उघडण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप निविदा भरलेल्या सुशिक्षित बेरोजगार संस्थांनी केला आहे. तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य उघड करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

'हमाली हाताळनुकीच्या निविदा उघडण्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाणीवपूर्वक उशीर'

या निवेदनानुसार बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय गोदामातील अन्नधान्याच्या हाताळणीसाठी 22 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदेमध्ये जवळपास एक ते आठ याप्रमाणे अटी व शर्ती लावण्यात आल्या होत्या. 16 डिसेंबर 2019 सायंकाळी पाच वाजेपर्यंत सदर निविदा भरण्याची मुदत होती.

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय गोदाममधील अन्नधान्य हाताळणुकीचे कंत्राट मिळण्यासाठी अनेक संस्था अध्यक्षांनी निविदा भरल्या आहेत. मात्र, सदर निविदा भरून जवळपास 3 महिन्याचा कालावधी झाला. तरीही जिल्हा पुरवठा अधिकारी या निविदा उघडण्यास जाणीवपूर्वक हाताळणुकीच्या निविदा उघडण्यास गेल्या 3 महिन्यापासून उशीर करत आहे. यामुळें नियमानुसार काम करणाऱ्या व शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून निविदा भरणार्‍या संस्थाचालकांवर मात्र अन्याय होत असल्याचा आरोप करत सदर प्रकरणाची नियमानुसार चौकशी व्हावी व भरलेल्या निविदा उघडून त्या निविदामध्ये दिलेल्या शर्ती व अटीचे पालन करणाऱ्या संस्थाचालकांना पात्र ठरवावे व जे नियमाचे पालन करणार नाहीत अशा संस्थाचालकांना अपात्र ठरवावे व निविदा लवकरात लवकर उघडाव्यात व सत्य काय ते उघड करावे, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्यावतीने स्वामी विवेकानंद संस्था वाशिम, श्रमिक तांत्रिक संस्था वाशिम, धनुसिंग नाईक संस्था वाशिम, साईनाथ संस्था वाशिम, श्रमशक्ती संस्था अकोलाचे संदीप बाजड, नितीन गवळी ,सावळे, ईश्वरकर, आदींनी केली आहे.

Last Updated : Mar 19, 2020, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.