बुलढाणा : तरुण वर्गामध्ये आज ही सरकारी नोकरीची क्रेझ कायम आहे. कारण एकदा सरकारी नोकरी मिळाली, की आपल्याला काम न करता आमदनी सुरू होते. असा बहुतांश लोकांचा गोड विचार आहे. त्यामुळेच प्रथम प्राधान्य हे सरकारी नोकरी करता दिले जाते. नंतर खाजगी नोकरी नाहीतर व्यवसाय निवडायचा असा आजच्या सुशिक्षित युवक वर्गाचा कल ( Self Employment Instead Government Job ) असतो. याला अपवाद ठरले आहे बुलढाणा जिल्ह्यातील जय-वीरूची ( Jai Veeru Jodi Buldhana ) जोडी.
ग्रॅज्युएट गुळाचा चहा : जिल्ह्यातील खामगाव येथील सचिन अवताडे आणि योगेंद्र नाचणे हे दोघेही ग्रॅज्युएट झालेले तरुण ( Graduate Gulacha Chaha ) आहेत. पण त्यांनी सरकारी किंवा खाजगी रोजगाराकडे न वळता, शिर्डी येथील प्रसिद्ध ग्रॅज्युएट गुळाचा चहाची संपूर्ण माहिती तसेच प्रशिक्षण घेतले. खामगाव शहरांमध्ये चहाचा छोटा उद्योग सुरू( Graduate Youth Business ) करत स्वयंरोजगारकडे पाऊल टाकले आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर दोघांनी काही काळ खाजगी रोजगार केल्यानंतर त्यात पाहिजे तसा त्यांना पगार मिळत नसल्याने, त्यांनी ग्रॅज्युएट झाल्यानंतर कोणता रोजगार मिळू शकतो. याकरता गुगल सर्च केल्यावर त्यांना शिर्डीतील ग्रॅज्युएट नावाचे गुळाचा चहाचे एक प्रसिद्ध ब्रँड म्हणून ( Famous Tea Brand In Shirdi ) दिसले. त्यांनी त्याचीच एक सेवा केंद्र संपूर्ण प्रशिक्षणानंतर खामगाव येथे सुरू केली आहे.
सरकारी नोकरीला बगल देत स्वयंरोजगार : आणि आज त्यांना तब्बल 40 ते 50 हजार रुपये मासिक नफा होत आहे. दररोज 500 पेक्षा जास्त चहाचे कप आवडीने संपूर्ण परिसरात पिले जातात. शहरातील सरकारी कार्यालय, दवाखाने, शहरात येणारे चाकरमानी हे आवडीने या ग्रॅज्युएट टी स्टॉलला आवर्जून भेट देत आहेत. फक्त चार लाख रुपये त्यांनी या व्यवसायामध्ये गुंतवले. सचिन आणि योगेंद्रच्या मैत्रीची देखील गावात एक जय - वीरूची जोडी म्हणून ओळख आहे. सोबत शिक्षण घेतल्यानंतर जो उद्योग त्यांनी सुरू केला, त्याला देखील मैत्री एंटरप्राइजेस म्हणून नाव देखील त्यांनी दिले ( Graduate Gulacha Chaha Buldhana ) आहे.
शिर्डीतील प्रसिद्ध ब्रँड : इतर तरुण वर्गाने देखील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फक्त नोकरीच्या मागे न धावता, स्वयंरोजगाराच्या दिशेने देखील विचार केल्यास निश्चित एक स्वयंरोजगार उभारू शकतो, असे त्यांनी ( Business Instead Government Job ) सांगितले. आज अनेक स्वयंरोजगार कसे उभे करावे, हे आपल्याला डिजिटल गुगलच्या मोठ्या दालनाच्या माध्यमातून माहिती मिळू शकते. तोच त्यांनी फंडा वापरत ग्रॅज्युएट झाल्यानंतर स्वयंरोजगार उभा करून एक उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी छोट्याशा या रोजगाराच्या रोपट्यामध्ये तीन परिवाराला देखील रोजगार दिला आहे असे ते आवर्जून सांगतात.