बुलडाणा - विधानसभा निवडणूकीत मतदारांनी आपल्या बहुमुल्य मताधिकाराचा उपयोग केला पाहिजे आणि मतदान करायलाच पाहिजे, यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कार्यक्रम घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरातील विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळीच्या माध्यमातून गो फॉर व्होट संदेश दिला आहे.
हेही वाचा... विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक होणार यात मुळीच शंका नाही - प्रकाश आंबेडकर
जिल्ह्यात सध्या अनेक कार्यक्रमातंर्गत 'गो फॉर व्होट'चा जागर करण्यात येत आहे. विविध कल्पक युक्त्यांचा वापर करत प्रशासन मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुलडाणा शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी एक मानवी रांगोळी साकारली आहे. यातून लोकांनी मतदान करावे असा संदेश देण्यात आला आहे. 'गो व्होट'चा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या चिन्हाची मानवी रांगोळी तयार केली. रांगोळीच्या माध्यमातून मतदारांना विद्यार्थ्यांनी मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले आहे.
हेही वाचा... पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर आरबीआयने व्यवस्थेत 'हा' केला बदल