बुलडाणा - जिल्ह्यातील चिखली येथील समाजकल्याण संचालनालयाच्या शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात एका तरुणीने खोलीमधील खिडकीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सविता रामदास वाढोरे ( वय 19 रा. ऊटी, ता. सेनगाव जि. हिंगोली) असे मृत मुलीचे नाव आहे.
सविता ही नर्सींग कॉलेजला शिकत होती. तिने आज सकाळी ९.३० ते १० वा दरम्यान आत्महत्या केली. आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वसतीगृहात जाऊन पंचनामा केला. पंचनाम्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविला आहे.