ETV Bharat / state

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत आता सर्वांना उपचाराचा लाभ - महात्मा फुले जन आरोग्य योजना

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ घेता येईल, असा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.

now everyone Free treatment under the scheme Under Mahatma Phule Janaarogya Yojana
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत आता सर्वांना उपचाराचा लाभ
author img

By

Published : May 28, 2020, 9:27 PM IST

बुलडाणा - राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ घेता येईल, असा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार, करोनाबाधित रुग्ण तसेच करोनाची लागण नसलेल्या राज्यातील 12 कोटी लोकांना या निर्णयामुळे उपचार घेता येणार आहेत.

शासकीय व पालिका रुग्णालयांचे सध्या कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्यामुळे शासकीय व पालिका रुग्णालयांमध्ये गुडघ्याची शस्त्रक्रिया व अन्य 120 उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ यापुढे जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 996 आजारांवरील उपचाराची सोय असून, पंतप्रधान जीवनदायी योजनेत 1 हजार 209 आजारांवर उपचार केले जातात. राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र, 23 मे रोजी आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार पांढरी शिधापत्रिका धारकांसह राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा मिळणार आहे. तो येाजनेचा लाभार्थी नसला तरी हा लाभ मिळणार आहे.

युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत असून, 31 जुलैपर्यंत या नव्या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील त्यातही मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन बहुतेक शासकीय व पालिका रुग्णालयांचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांसाठी आगामी काळात खाटा कमी पडू नयेत व कोरोना नसलेल्या रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावे, यासाठी सर्वच नागरिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

शासकीय रुग्णालयांत 120 आजारांवर उपचार घेण्यासाठी तयार केलेल्या विशेष पॅकेज योजनेचा लाभ आता या योजनेतील अन्य खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली असली तरी राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन गरज वाटल्यास या योजनेला मुदतवाढ दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयान्वये कळवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.