बुलडाणा - जिल्ह्यात आज नव्याने ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यातील १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅबच्या अहवालांपैकी आज 68 अहवाल निगेटिव्ह आले. तर 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालात पारपेट येथील 29 वर्षीय पुरुष व 6 वर्षीय चिमुकलीचे आहेत. तसेच धामणगाव बढे येथील 30 वर्षीय पुरुष रुग्णाचा आहे. सदर 30 वर्षीय पुरुष रूग्ण 19 जूनला मृत झाला असून या रुग्णाचा तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.
आज 14 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांना आज सुट्टी देण्यात आली. यामध्ये शेगाव कोविड रुग्णालयातून पातुर्डा येथील 58 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 46 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 44 वर्षीय महिला व 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तसेच मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील 70 वर्षीय वृद्ध महिला, बहापुरा येथील 24 वर्षीय महिला, संग्रामपुरातील विठ्ठल चौक येथील 24 वर्षीय पुरुष, ब्राम्हण चिकना येथील 25 वर्षीय महिला व 30 वर्षीय पुरुष, भुमराळा येथील 40 वर्षीय महिलेचा आहे.
आतापर्यंत 2117 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 151 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी सहा मृत आहेत. आतापर्यंत 109 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रूग्णालयात 36 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज रोजी 91 अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2117 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.