बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी पोलिसांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे पिच क्युरेटर प्रवीण हिंगणीकर (६५) आणि त्यांची पत्नी पुण्याहून नागपूरला परतत असताना मेहकर तालुक्यातील कल्याणा गावात हा अपघात झाल्याची माहिती दिली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एक ट्रक गावाजवळ महामार्गावर उभा होता, तेव्हा त्याला एका कारने मागून धडक दिली. या धडकेने हिंगणीकर यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर प्रवीण हिंगणीकर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कार ट्रकवर आदळली : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र काही केल्या थांबतांना दिसत नाही. आज मेहकर हद्दीत उभ्या ट्रकला क्रेटा गाडी येऊन धडकल्याची घटना घडली आहे. या माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्यावरून नागपुरला जात असलेली क्रेटा कार उभ्या ट्रकला धडकल्याने कारचा चक्काचुर झाल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वाहन क्रमांक एम एच 31, 6622 या गाडीतून प्रवीण हिंगणीकरल तसेच त्यांची पत्नी पुण्यावरून नागपूरला जात होते.
हिंगणीकर यांच्यावर खाजगी रुग्णलयात उपचार : हिंगणीकर यांची कार मेहकर तालुक्यातील कल्याणा जवळ उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशा, चुराडा झाला आहे. अपघातात हिंगणीकर यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर ते स्वतः गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींवर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र थांबता थांबणे ना असतांना. यावर अनेक उपाययोजना करण्याबाबत प्रयोग करण्यात येत आहे. गाडीच्या चाकातली हवा त्याची तांत्रिक स्थिती या बाबी चांगल्या असल्यावरच आता आपण समृद्धी मार्गावर आपले वाहन घेउन जाऊ शकतो. मात्र, निष्काळजीपणाने वाहन चालवल्यास गाडीचा अपघात होण्याचे प्रमाण वाढते असे पोलिसांचे म्हणणे आहे.