बुलडाणा - विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे तीन वेळा शिवसेनेचे आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनी मंगळवारी (25 ऑगस्ट) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार आकाशदादा फुंडकर व भाजप आमदार श्वेता महाले-पाटील, भाजप नेते योगेंद्र गोडे यांची उपस्थित होती. गेल्या विधासभेला शिवसेनेने शिंदे यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता आणि वंचितकडून विधानसभा लढविली होती. यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर होते.
सुरुवातीला भगवा त्यानंतर निळा आणि आता भाजपचा झेंडा विजयराज शिंदे यांनी हाती घेतला आहे. शिंदेंसोबत प्रवेश शिवसेना माजी जिल्हा प्रमुख महिला आघाडी तथा नगरसेविका सिंधुताई खेडेकर, बाजार समिती संचालक माजी तालुका प्रमुख शिवसेना अर्जुन दांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम नारखेडे, पुरुषोत्तम लखोटीया, माजी उपसभापती पंचायत समिती मोताळा कृष्णा भोरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, माजी नगरसेवक संजय नागवनशी, समाधान राऊत, गणेश पाटील, सागवान सरपंच सौ कांताबाई राजगुरे,सरपंच गुलभेली तुकाराम राठोड,ज्ञानेश्वर राजगुरे, सचिन शेळके, अशोक किंन्होळकर, मो सोफियान जनसेवक, रहीम शाह, हेमंत जाधव, वैभव ठाकरे, राजेश सुरपाटणे, अविनाश शेंडे, सुनील काटेकर यांनीही भाजपात प्रवेश केला.