बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव शहरानजीक असलेल्या खामगाव-चिखली मार्गावरील रायगड नामक सरकी गोडाऊनला सोमवारी (दि. 26 एप्रिल) संध्याकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आली. या आगीत गोडाऊनमध्ये ठेवलेले कोट्यवधींची सरकी जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
गोडाऊनमध्ये होती सुमारे सहा हजार क्विंटल सरकी
खांमगाव येथील खामगाव-चिखली मार्गावरील "रायगड" नामक गोडाऊनमध्ये नंदकिशोर गोयनका या व्यापाऱ्याची सुमारे सहा हजार क्विंटल सरकी ठेवलेली होती. दरम्यान, आज सोमवारी संध्याकाळी या गोडाऊनमधून सायंकाळी अचानक आगीचे लोण निघाल्याने आग लागल्याची घटना उघड झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यातून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होते. या आगीत सुमारे अडीच कोटी रुपयांची सरकी जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हेही वाचा - या कारणामुळे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातच रुग्ण घेवून पोहचली थेट रुग्णवाहिका