ETV Bharat / state

पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये विषारी साप सोडणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल - शुभम अशोक शिलारकर

लॉकडाऊन काळात पेट्रोल न दिल्याने रागाच्या भरात पेट्रोलपंपाच्या ऑफिसमध्ये विषारी जातीचे साप सोडल्याची घटना जिल्ह्यात घडली होती. संबधित युवकाविरोधात बुलडाणा वनविभागाने भारतीय संरक्षण वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर युवकाचे नाव शुभम अशोक शिलारकर (वय 24 वर्ष) असे असून तो सध्या फरार आहे.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : Jul 22, 2020, 9:39 AM IST

Updated : Jul 22, 2020, 10:18 AM IST

बुलडाणा - लॉकडाऊन काळात पेट्रोल न दिल्याने रागाच्या भरात पेट्रोलपंपाच्या ऑफिसमध्ये विषारी जातीचे साप सोडल्याची घटना जिल्ह्यात घडली होती. संबधित युवकाविरोधात बुलडाणा वनविभागाने भारतीय संरक्षण वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर युवकाचे नाव शुभम अशोक शिलारकर (वय 24 वर्ष) असे असून तो सध्या फरार आहे.

बुलडाणा येथील मलकापुर रोडवरील चौधरी पेट्रोल पंप मालकाने लॉकडाऊन नियमांच्याविरोधात जाऊन शुभमला पेट्रोल देण्यास नकार दिला. त्यावर रागाच्या भरात बुलडाण्यातील 24 वर्षीय शुभम अशोक शिलारकर याने पेट्रोलपंप मालकाच्या ऑफिस व अन्य दोन रूममध्ये दोन विषारी कोब्रा व एक धामण, असे तीन साप सोडल्याची धक्कादायक घटना 13 जुलैला दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घडली होती.

सदर घटनेचे दृष्य पंपावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील घटनेचे दृष्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान पंपमालक सरिता चौधरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार न देता सदर प्रकरण आपसात मिटवले. मात्र, हे प्रकरण बुलडाणा उपवनसंरक्षक संजय माळी यांनी गंभीरतेने घेत वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांना सदर युवकावर विषारी साप बाळगल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

आरोपी शुभम हा स्वतः सर्पमित्र बनून फिरतो, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांना मिळाली. पेट्रोलपंपाच्या ऑफिसमध्ये विषारी जातीचे साप सोडल्याने त्याच्याविरोधात वनरक्षक विष्णु काकड यांनी भातीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास डीएफओ संजय माळी, एसीएफ रंजीत गायकवाड, आरएफओ गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राहुल चव्हाण करीत असून सद्या आरोपी फरार आहे. आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Last Updated : Jul 22, 2020, 10:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.