बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथील जन्मादात्या बापानेच आपल्या 13 वर्षीय मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिव्यांग बापाला अटक केली आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आईच्या कुशीत झोपला होता
सिध्देश्वर सखाराम नन्हई (वय, 40) असे आरोपी बापाचे, तर अमर नन्हई (वय, 13) हे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. दिव्यांग असलेला सखाराम नन्हई हा दररोज दाऊ पिऊन पत्नी व मुलांना त्रास द्यायचा. गावातील लोकही त्याच्यापासून दोन हात दूर असत. सकाळी चारच्या सुमारास सिध्देश्वरची 5 वर्षीय मुलगी जान्हवी, मुलगा अमर, पत्नी रत्नमाला गाढ झोपेत होते. तेव्हा आईच्या कुशीत झोपलेल्या मुलाला शौचास जाण्याच्या बहाण्याने घेऊन नदीच्यापात्रात गेला. तिथे त्याने मूलाचा गळा आवळला.
मुलाला मारल्याचे सांगत आला गावात
माझ्या मुलाला मारुन टाकल्याचे सांगत सिध्देश्वर गावात आला, अमर घरी नसल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, गावातील लोकांनी सिध्देश्वरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून मृतदेह नेमका कोठे टाकला याची माहिती घेऊन नदीपात्रातील नाल्यातून तो बाहेर काढण्यात आला.