ETV Bharat / state

चारा-पाण्याअभावी जनावरांची बेभाव विक्री; पशुपालकांची चारा छावण्यांची मागणी - चाराटंचाई

माणसांनाच पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तर मग जनावरांची तहान कशी भागवावी ? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. पाणीटंचाईसोबत चाराटंचाईनेसुध्दा आपले डोके वर काढले असून चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव पशुमालकांना आपली जनावरे बाजारात मातीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे पशू मालकांची हेळसांड होत असून ती थांबविण्यासाठी चारा छावणी सुरू करण्यात यावी, अशी मागणी पशुमालक व शेतकरी करीत आहेत.

चारा-पाण्याअभावी जनावरांची बेभाव विक्री
author img

By

Published : May 16, 2019, 9:26 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात गेल्या ३-४ वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे संपूर्ण जिल्हाभरातच चारा आणि पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे चाऱ्याचे भावही गगनाला भिडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर जीवापाड जपलेली जणावरे अक्षरशः विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गुरांचा बाजार भर उन्हाळ्यात गच्च भरलेला दिसत असून पशुपालकांना आपली जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत.

चारा-पाण्याअभावी जनावरांची बेभाव विक्री

माणसांचीच पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होत असताना जनावरांना पाणी आणि चारा कुठून द्यावा, असा प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प कोरडे पडले असून अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईसोबत चाराटंचाईनेसुध्दा आपले डोके वर काढले असून चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात एकूण १० लाख ७२ हजार ९३७, असे लहान मोठे पशुधन आहे. त्यासाठी दररोज १४ हजार १४ मेट्रीक टन चारा लागतो. मात्र, येथे केवळ निम्मा चाराच उपल्बध आहे. सध्यस्थितीत कडब्याच्या एका पेंडीचा भाव २५ ते ३० रुपये झाले आहे. एका जनावरास दिवसभरात कमीत कमी ४ ते ५ पेंड्या लागतात. त्यामुळे जनावरांचे पोट कसे भरावे या विवंचनेत पशुमालक सापडले आहेत. जिल्ह्यात भीषण चाराटंचाई असतानादेखील प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू केली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव पशुमालकांना आपली जनावरे बाजारात मातीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे पशू मालकांची हेळसांड होत असून ती थांबविण्यासाठी चारा छावणी सुरू करण्यात यावी, अशी मागणी पशुमालक व शेतकरी करीत आहेत.

Intro:Body:बुलडाणा :- गेल्या तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेली चारा व पाणी टंचाई मुळे चाऱ्याचे वाढते भाव आणि यासह इतर कारणांमुळे अनेक शेतकरी आपली जनावरे विक्रीस काढत आहेत..त्यामुळे गुरांचा बाजार भर उन्हाळ्यात गच्च भरलेला दिसत आहे , तर पर्यायाने पशुपालकांना आपली जनावरे ही कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत.

माणसांचीच पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होत असताना जनावरांना पाणी आणि चारा कुठून द्यावा असा प्रश्न पशुपालक शेतक-यांच्या समोर निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प कोरडे पडले असून, अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. माणसांनाच पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तर मग जनावरांची तहान कशी भागवावी असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.पाणीटंचाईसोबत चाराटंचाईने सुध्दा आपले डोके वर काढले असून चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहे.

बाईट :-
1) समाधान रहिराव (शेतकरी)
2) राजेंद्र काकडे (शेतकरी)

बुलडाणा जिल्ह्यात एकूण १० लाख ७२ हजार ९३७ असे लहान मोठे पशुधन आहे त्यासाठी दररोज १४ हजार १४ मेट्रिक टन चारा लागतो मात्र यामध्ये चार उपलब्धते नुसार निम्मे चार च उपल्बध आहे , सध्या स्थितीत कडब्याच्या एका पेंडीचे भाव पंचवीस ते तिस रुपये झाले आहे. एका जनावरास दिवसभरात कमीत कमी चार ते पाच पेंड्या लागतात. त्यामुळे जनावरांचे पोटकसे भरावे या विवंचनेत पशु मालक सापडले आहेत. जिल्ह्यात भीषण चारा टंचाई असताना देखील प्रशासनाने आता पर्यंत जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरु केली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव पशु मालकांना आपली जनावरे बाजारात मातीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे पशु मालकांची हेळसांड होत असून ती थांबविण्यासाठी चारा छावणी सुरू करण्यात यावी, अशी मागणी पशु मालक व शेतकरी करीत आहेत.

बाईट :- सौ. वनिता उईके (सहा.पशु संवर्धन अधिकारी, बुलडाणा)

- वसीम शेख , बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.