ETV Bharat / state

प्रचार खर्चावर निवडणूक आयोगाची नजर, खुर्च्याही मोजणार

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचारात लागणारी साधने, वस्तू, उपकरणे व इतर अनुषंगिक खर्चाचे दर निश्चित केले आहेत. वर्गवारीनुसार ११ परिशिष्ट तयार करण्यात आली आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय
author img

By

Published : Apr 3, 2019, 10:01 AM IST

Updated : Apr 3, 2019, 10:36 AM IST

बुलडाणा - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून उमेदवारांच्या प्रचार खर्चावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. खर्चाचे दरपत्रक वाढल्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची दमछाक होताना पाहायला मिळत आहे. उमेदवाराचा खर्च कसा होतो ? याच्यावर आयोगाच्या कॅमेराची नजर असणार आहे.

प्रचार खर्चावर निवडणूक आयोगाची नजर

राजकारण म्हटले की खुर्च्या, हार, जेवणं आलीच. यात पैशांची वारेमाप उधळपट्टी ही ठरलेलीच. मात्र, आता चक्क निवडणूक आयोगाची नजर या सर्व वस्तूंवर असणार आहे. उमेदवाराचेजाहीर सभा, मेळावे, कार्यालय यासह प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या खुर्च्यांची मोजणीसह अन्य साहित्याची मोजणीही केली जात आहे. त्यासंबंधीची दर सूचीही प्रत्येक उमेदवाराला देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचारात लागणारी साधने, वस्तू, उपकरणे व इतर अनुषंगिक खर्चाचे दर निश्चित केले आहेत. वर्गवारीनुसार ११ परिशिष्ट तयार करण्यात आली आहेत.

परिशिष्ट एकमध्ये जेवण, नाश्ता, खाद्य पदार्थांचे दर, तर परिशिष्ट दोनमध्ये प्रचार साहित्याचे दर, भाडे; परिशिष्ट तीनमध्ये प्रती दिवस वाहनाचे भाडे; परिशिष्ट चारमध्ये हॉटेल, गेस्ट हाऊसचे प्रती दिन दर,परिशिष्ट पाचमध्ये प्रचार फलक,सहामध्ये प्रचार साहित्य,सातमध्ये हार-बुके; आठमध्ये फटाक्यांचे दर, नऊमध्ये जाहिरात प्रकाशनाचे, परिशिष्ट दहामध्ये वृत्तपत्रांचे शासकीय दर, तर ११ मध्ये हेलिपॅडचे दरहीनमूदकरण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे हा सर्व खर्च करताना आयोगाच्या व्हिडीओ शूटिंगमध्ये संपूर्ण प्रचार कैद होत असल्याने त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आणि लागणाऱ्या साहित्याची मोजदादही होत आहे. मंडप, साऊंड सिस्टीम, वाहने, सोफा, ढोलताशे यासह प्रचारासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडीओ शूटिंगच्या माध्यमातून मोजदाद केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या खर्चाचा हिशेब दररोज आयोगाला सादर करावा लागणार असून उमेदवाराने हि त्यांच्याकडे याची नोंदणी ठेवायची आहे.

Intro:Body:anchor -- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून उमेदवाराच्या प्रचार खर्चावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे .. तर खर्चाचे दरपत्रक वाढल्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची दमछाक होताना पाहायला मिळतेय ..शिवाय उमेदवाराचा खर्च कसा होतोय ? याच्यावर आयोगाच्या कैमराची हि नजर असणार आहे ..

व्हिओ -१-- राजकारण म्हटले की खुर्च्या ,हार , जेवण आलीच आणि  या खेळात पैशांची वारेमाप उधळपट्टी ही ठरलेलीच.. . मात्र , आता चक्क निवडणूक आयोगाची नजर या सर्व वस्तूंवर असणार आहे ..   उमेदवाराचे  जाहीर सभा, मेळावे, कार्यालय यासह प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या खुर्च्यांची मोजणी सह अन्य साहित्याची मोजणी हि केली जात आह.. त्यासंबंधीची दरसूचीही प्रत्येक उमेदवाराला देण्यात आलीय .. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचारात लागणारी साधने, वस्तू, उपकरणे वा इतर अनुषंगिक खर्चाचे दर निश्चित केले असून  वर्गवारीनुसार याचे ११ परिशिष्ट तयार करण्यात आलेय .  परिशिष्ट एकमध्ये जेवण, नाश्ता , खाद्य पदार्थांचे दर.. तर परिशिष्ट दोनमध्ये प्रचार साहित्याचे दर , भाडे; परिशिष्ट तीनमध्ये प्रती दिवस वाहनाचे भाडे; परिशिष्ट चारमध्ये हॉटेल , गेस्ट हाऊसचे प्रती दिन दर,  परिशिष्ट पाचमध्ये प्रचार फलक,  सहामध्ये प्रचार साहित्यांचे  सातमध्ये हार-बुके; आठमध्ये फटाक्यांचे दर, नऊमध्ये जाहिरात प्रकाशनाचे, परिशिष्ट दहामध्ये वृत्तपत्रांचे शासकीय दर नमूद करण्यात आलेय ..  तर ११मध्ये हेलिपॅडचे दर हि  नमूद  कार्नाय्त आले आहेत... विशेष म्हणजे हा सर्व खर्च करताना आयोगाच्या व्हिडीओ शूटिंगमध्ये संपूर्ण प्रचार कैद होत असल्याने त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आणि लागणाऱ्या साहित्याची मोजदादही होत आहे..मंडप, साऊंड सिस्टीम, वाहने, सोफा, ढोलताशे यासह प्रचारासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची व्हिडीओ शूटिंगच्या माध्यमातून मोजदाद केली जात आहे. .. तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या खर्चाचा हिशेब दररोज आयोगाला सादर करावा लागणार असून उमेदवाराने हि त्यांच्याकडे याची नोंदणी ठेवायची आहे .. 

बाईट - सचिन इगे , नोडल अधिकारी ,खर्च व्यवस्थापन , निवडणूक विभाग ,बुलढाणा .. 

व्हिओ -२- तर जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत , त्यांच्यासाठी हा संपूर्ण होशेब दाखवताना अडचणी येणार असून दोखेदुखी वाढलीय .. कारण आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवाराला फक्त ७० लाखांची मर्यादा आहे .. ज्या दिवशीपासून उमेदवारांनी अर्ज भरला त्यादिवसा पासून हा खर्च लागू झाला असून निकाल लागेपर्यंत संपूर्ण खर्चाचा हिशेब द्यावा लागणार आहे .. सर्वात माहतवाहचे म्हणजे मागच्या निवडणुकीत हाच खर्च ५० लाखाचा होता .. मात्र आता आयोगाने दरपत्रक वाढवल्याने  हे सर्व करताना उमेदवारांची दमछाक होतेय .. तर याचा प[परिणाम त्यांच्या प्रचारावर सुद्धा होऊ सह्कतो असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायेत ..

बाईट -- राजेंद्र काळे ,राजकीय विश्लेषक , बुलढाणा .. 

व्हिओ -३-- मात्र हे सर्व दरपत्रक पाहिल्याने खरंच उमेदवार याची नोंदणी ठेवणार आहे ? आणि आयोग कितपत याच्यावर नजर ठेवणार हे पाहणे तितकेच महत्वाचे असणार आहे .. 

साहित्याचे आयोगाचे दरपत्रक

व्हीआयपी खुर्ची : ५० रुपये

प्लास्टिक खुर्ची : पाच रुपये

सतरंजी : ५० रुपये

जेवण....

शाकाहारी जेवण प्रती प्लेट : ९० रुपये

शाकाहारी नाश्ता प्रती प्लेट : २० रुपये

मांसाहारी जेवण प्रती प्लेट : १८० रुपये

मांसाहारी नाश्ता प्रती प्लेट : ५० रुपये

चहा : सहा रुपये

कॉफी : दहा रुपये

पाणी बाटली : १५ रुपये

प्रचार साहित्य...

व्हिडीओ शूटिंग : १५०० रुपये

ड्रोन कॅमेरा: ४००० रुपये

ढोलताशे (दहा माणसे) : ३००० रुपये

बॅन्जो पार्टी (दहा माणसे) : ७००० रुपये यासह इतर .. 

-वसीम शेख,बुलडाणा-

महत्वाचे:-सभेमधील खुर्च्या चे विजवल्स आणि न्यूज ला लागणारे व्हिडीओ आपल्याकडून घ्यावे..Conclusion:
Last Updated : Apr 3, 2019, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.