ETV Bharat / state

बुलडाण्याच्या डॉक्टरांकडून 4 हजार 100 रुग्णांना जीवनदान

गेल्या वर्षी विदर्भातून बुलडाण्यात पहिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. यामुळे विदर्भासह बुलडाणा जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले होते. कोविड रूग्णांच्या उपचारासाठी बुलडाण्यात महिलांच्या उपचारासाठी बांधलेले 100 बेडचे स्त्री रुग्णालयाचे उभारले. या काळातकोरोनाग्रस्त रुग्णांचे नातेवाईकही जवळ येत नव्हते. या परिस्थितीमध्ये त्यांना आधार देण्याचे काम डॉक्टरांनी केले.

4 हजार 100 रुग्णांना जीवनदान
4 हजार 100 रुग्णांना जीवनदान
author img

By

Published : Jul 4, 2021, 7:59 AM IST

Updated : Jul 4, 2021, 10:08 AM IST

बुलडाणा - डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्ण तसेच नातेवाईकांसाठी डॉक्टर हा देवदूत असते. त्यांच्या कौशल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे. कोरोना महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता, त्या रुग्णांना सेवा देत आहेत. या डॉक्टर योद्ध्यांनी कोरोनाच्या लाटेत बुलडाण्याच्या 100 बेडच्या स्त्री कोविड रुग्णालयात 4 हजार 500 रुग्णांना भरती केली. त्यापैकी 4 हजार 100 रुग्णांना जीवनदान दिले आहे. अशा महामारीच्या काळात रुग्ण सेवा करण्याची संधी मिळाली. आम्हाला डॉक्टर असल्याचा सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया स्त्री रुग्णालयातील सेवा देणाऱ्या डॉक्टर योद्ध्यांनी दिली.

डॉक्टरांचे मनोगत

डॉक्टरांनी केले जवळ

गेल्या वर्षी विदर्भातून बुलडाण्यात पहिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. यामुळे विदर्भासह बुलडाणा जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले होते. कोविड रूग्णांच्या उपचारासाठी बुलडाण्यात महिलांच्या उपचारासाठी 100 बेडचे स्त्री रुग्णालय उभारले. या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांचे नातेवाईकही जवळ येत नव्हते. या परिस्थितीमध्ये त्यांना आधार देण्याचे काम डॉक्टरांनी केले. वाढत्या रुग्णांमुळे बेडपासून ऑक्सिजन आणि अन्य सुविधा पुरविण्यासाठी डॉक्टर देवासारखे धावून आले. तर ही भूमिका स्त्री कोविड रुग्णालयामध्ये रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ.सचिन वासेकर यांनी बजावली.आरटीपीसीआर चाचणीचे नोडल अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, फिजीशियन असलेले डॉ.मोहम्मद अस्लम जमाल, डॉ.भागवत भुसारी,डॉ.आशिष चांगाडे,तुषार उन्हाडे शिवाय वैधकीय अधिकारी डॉ.सैय्यद अर्षद, डॉ.शिवानंद साखरे, डॉ.सुबिया अर्षद, डॉ.पूजा वर्मा, डॉ.सोनाली खोमणे, डॉ.अजिंक्य काळे, डॉ.प्राजक्ता गायकवाड, डॉ.अंकिता शेळके, डॉ.सानिया अंकुश, डॉ.मुरदुल्ला भावसार, डॉ.पूजा काळवघे, डॉ.अंकिता पवार यासह 40 डॉक्टरांच्या टीमने चोख बजावली.

वैद्यकीय साहित्य केले उपलब्ध

कोरोना महामारीच्या काळात बुलडाणा जिल्ह्यात 86 हजार 826 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86 हजार 10 रूग्णांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असून, तर 4 हजार 500 रुग्णांना उपचारासाठी भरती केले आहे. या कालावधीत 4 हजार 100 रुग्णांना मृत्यूच्या खाईतून वाचवले आहे.

4 हजार 100 रुग्णांना जीवनदान
4 हजार 100 रुग्णांना जीवनदान

डॉक्टर होण्याचा अभिमान

अनेक रुग्णांना जीवदान देण्याचे काम केलं बुलडाणा येथील कोवीड रुग्णालयामध्ये 4 हजार 500 रुग्ण कोवीडने बाधित झाल्यामुळे उपचाराकरिता दाखल झाले होते. त्यातील 4 हजार 100 रुग्णांना जीवदान देण्यास आपली डॉक्टर सेवा कामी आली. ज्यावेळेस रुग्ण बरा होऊन घरी जात होता,त्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आपण डॉक्टर झाल्याचा समाधान वाटत होत.डॉक्टांरांनी रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे. हे तत्व आमच्या सर्व डोळ्यासमोर ठेवून कोरोना काळात काम केले.याचा व आपण स्वतः डॉक्टर असल्याचा सार्थ अभिमान आहे अशी प्रतिक्रिया बुलडाणा येथील कोवीड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सचिन वासेकर यांनी दिली.तर डॉक्टर झाल्यानंतर गरजू रूग्णांची सेवा आपल्या हातून घडावी अशी आपली इच्छा होती ती सेवा करण्याची संधी कोवीड माहामारीच्या काळात आपण मिळाली आपणाला डॉक्टर असल्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया डॉ अर्षद यांनी व अनेक रुग्णांना जीवदान देण्याचे काम आमच्यातून झालं याचा सार्थ अभिमान आपणाला असल्याच्या प्रतिक्रिया कोविड रुग्णालयातील काही डॉक्टरांनी यावेळी दिली.

Last Updated : Jul 4, 2021, 10:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.