ETV Bharat / state

मलकापुरात वाढदिवस कार्यक्रमात तलवारी घेवून नाच, गुन्हा दाखल - हाजी राशिदखॉं जमादार

सध्या सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढदिवसाचा केक तलवारीने कापण्याची क्रेझ वाढत आहे. धारदार तलवारी कार्यक्रमाच्या स्थळी हाताळणे हा गुन्हा आहे.

मलकापुरात वाढदिवस कार्यक्रमात तलवारी घेवून नाच
वाढदिवस कार्यक्रमात तमलकापुरात वाढदिवस कार्यक्रमात तलवारी घेवून नाचलावारी घेवून नाच
author img

By

Published : Feb 11, 2021, 3:50 PM IST

Updated : Feb 11, 2021, 4:18 PM IST

बुलडाणा - सध्या सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढदिवसाचा केक तलवारीने कापण्याची क्रेझ वाढत आहे. धारदार तलवारी कार्यक्रमाच्या स्थळी हाताळणे हा गुन्हा आहे. तरी देखील बुधवारी 10 फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष हाजी राशिदखॉं जमादार यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी जल्लोषात तलवारी हवेत फिरवल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोहम्मद शोहेब मोहम्मद जाहीर, नवेद खान इस्माईल खान या 2 आरोपिंना ताब्यात घेवून 5 तलवारी जप्त केल्या. त्यामुळे मलकापूर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मलकापुरात वाढदिवस कार्यक्रमात तलवारी घेवून नाच

प्रसिद्धी मिळविण्याचा नवीन स्टंट-

वाढदिवसाला काहीतरी वेगळे करत प्रसिद्धी मिळविण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. मागील काही दिवसांपासून नेत्यांचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्याचा सपाटा सुरु आहे. यात वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारी आणि चाकूचा सर्रास वापर वाढला आहे. याचीच पुनरावृत्ती करत प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र वारंवार अशा प्रकारचे स्टंट पाहून नागरिकांकडून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष हाजी राशिदखॉं जमादार यांचा बुधवारी वाढदिवस होता. दरम्यान, मलकापूर शहरातील नगर परिषदेच्या शाळेच्या आवारात रात्री उशिरापर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी असंख्य तलवारी हवेत फिरविल्या. तर विविध प्रकारचे नारे ही यावेळी दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने मलकापूर शहर पोलिसांनी दखल घेत रात्री उशिरा 2 युवकांना अटक करून त्यांच्याकडून 5 तलवारी जप्त केल्या. तसेच त्यांच्याविरुद्ध आर्म ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विरोधकांनी हा प्रकार घडून आणला- हाजी राशिदखॉं जमादार

माझा बुधवारी वाढदिवस होता. यानिमित्त मलकापूरमध्ये नगर परिषदेच्या शाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात माझ्या विरोधकांनी माझ्या बदनामी करण्याचा डाव रचला व या कार्यक्रमात काही युवक तलवारी घेवून पाठविले. केक कापतांना माझ्या हातात जबरदस्तीने तलवारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मी तलवार हातात घेतली नाही. ज्या युवकांच्या हातात तलवारी होत्या त्यांना कार्यक्रम स्थळाहून जाण्यास सांगितले. मला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, असे आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.

हेही वाचा- राज्यपाल विरुद्ध सरकार : राज्यपालांना सरकारी विमान नाकारले

हेही वाचा- कोरेगाव भीमा हिंसाचार: रोना विल्सनच्या लॅपटॉपबाबत करण्यात आला 'हा' दावा

Last Updated : Feb 11, 2021, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.