बुलडाणा: सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ही कार नागपूरहून मुंबईकडे जात होती. मात्र, चॅनल 305 म्हणजे देऊळगाव पोळ गावाजवळ कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या रेलिंगला धडककली आणि भीषण अपघात घडला.
वाहतुकीचा खोळंबा: अपघातग्रस्त कारमधून तीन जण प्रवास करत होते. जखमीवर दुसर बीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की, समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडोरवरची वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. मृतदेह दुसर बीड रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या अपघातामधील मृतकांची नावे अद्याप कळू शकली नाही. पुढील चौकशी पोलीस करत आहे.
कारच्या धडकेत एकाचा मृत्यू: मुंबईतील वरळी डेअरीनजीक भरधाव वेगाने जात असलेल्या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात 58 वर्षीय राजलक्ष्मी रामकृष्णन यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजता घडली होती. निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवून राजलक्ष्मी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरळी पोलिसांनी आरोपी कार चालक सुमेर मर्चंट (23) याला अटक केली होती. प्राथमिक तपासात त्याने मद्य प्राशन करून गाडी चालवल्याचे निदर्शनास आले होते
चालकाने मद्यपान केल्याने अपघात: सुमेर मर्चंटची एक मैत्रीण आणि मित्र यांना दादर येथील शिवाजी पार्क येथे सोडण्यासाठी सुमेर ताडदेव येथील त्याच्या राहत्या घरातून सहा वाजता निघाला. मित्र-मैत्रिणीला शिवाजी पार्क येथे सोडून आल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात झाला. वरळी पोलिसांनी सुमेर मर्चंटसोबत त्याच्या कारमधून प्रवास करणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींचे जबाबदेखील नोंदवले आहेत. अपघाताच्या आदल्या रात्री आरोपी सुमेरच्या ताडदेव येथील घरी पार्टी होती, त्यावेळी त्यांनी तेथे मद्यपान केले असल्याचे दोघांनीही पोलिसांना जबाबात सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शीनीदेखील सुमेर मर्चंट याने मद्यपान केले असल्याचे सांगितले.
भरधाव कारची वाहनांना धडक: बेंगळुरू येथे भरधाव वेगात चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात घडला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी एचएसआर लेआउट वाहतूक पोलिस स्टेशन अंतर्गत सर्जापूर रोडवरील विप्रो गेटजवळ घडली. ओव्हरस्पीडमुळे कार चालकाची दुचाकी, एक ऑटो आणि पुढे जाणाऱ्या पाच कारला धडक बसली. या अपघातात झोमोटो डिलिव्हरी बॉयसह दोन जण जखमी झाले आहेत. कारचा चालकही किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागून येणाऱ्या कारच्या डॅशबोर्डवर अपघाताचे दृश्य कैद झाले आहे. याप्रकरणी एचएसआर लेआउट वाहतूक स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.