ETV Bharat / state

बुलडाणा: 527 ग्रामपंचायतींचे सरपंच निवडले जाणार तीन टप्प्यांमध्ये

जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत, त्यानंतर सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली, आणि आता सरपंच आणि उपसरपंच पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच तीन टप्प्यात निवडले जाणार आहेत.

author img

By

Published : Feb 3, 2021, 10:01 PM IST

527 ग्रामपंचायतींचे सरपंच निवडले जाणार तीन टप्प्यांमध्ये

बुलडाणा - जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत, त्यानंतर सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली, आणि आता सरपंच आणि उपसरपंच पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच तीन टप्प्यात निवडले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी दिली आहे. 9,10 आणि 11 फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांत ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड होणार आहे.

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ५२७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 527 ग्रामपंचायतींपैकी 28 ग्रामपंचायतींच्या सदस्यांची निवड बिनविरोध झाली, तर उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली होती. 18 जानेवारीला निवडणुकांचा निकाल घोषित करण्यात आला, तर 29 जानेवारीला सरपंच पदासाठीची जिल्हास्तरावर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान आता 9,10, आणि 11 फेब्रुवारी अशी तीन टप्प्यांमध्ये सरपंच आणि उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे.

सरपंचाची निवड होणाऱ्या गावांची तालुका निहाय संख्या

बुलडाणा 51, चिखली 66, देऊळगाव राजा 28, सिंदखेडराजा 43, मेहकर 41, लोणार 16, खामगाव 71, शेगाव 34, जलगाव 25, संग्रामपूर 27, मलकापूर 33, नांदुरा 48, मोताळा 52

बुलडाणा तालुक्यातील ५१ सरपंचांचा फैसला ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान

बुलडाणा तालुक्यातील ५१ सरपंचांचा फैसला ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली या सरपंच पदाच्या निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. ९ फेब्रुवारीला दहिद खुर्द व बुद्रुक, देऊळघाट, सोयगाव, डोंगर खंडाळा, मासरूळ, मातला, नांद्रा कोळी, रुईखेड टेकाळे, साखळी बुद्रुक, शिरपूर, बिरसिंगपूर, कोलवड, सागवान व तांदुळवाडी येथील
सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. तर १० फेब्रुवारीला अजीसपूर, भडगाव, देवपूर, गुम्मी, चांडोळ, जांब, हातोडी बुद्रुक, म्हसला बुद्रुक, पाडळी, पळसखेड भट व नागो, पांगरी, रायपूर, सातगाव म्हसला येथील सरपंच निवडले जातील. ११ फेब्रुवारीला डोमरुळ, तराडखेड, वरुड, अंभोडा, भादोला, धाड, धामणगाव, जामठी, जनुना, सावळी, कुलमखेड, दुधा, मालवंडी, मालविहिर, मढ, केसापूर, बोरखेड, सिंदखेड येथील सरपंचांची निवड होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.