ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - बँक कर्मचारी आंदोलन न्यूज

विविध प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने बुलडाण्यातील बँक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विविध घोषणा देऊन बँक कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.

बँक कर्मचाऱ्यांचा मोर्चा
बँक कर्मचाऱ्यांचा मोर्चा
author img

By

Published : Feb 2, 2020, 9:44 AM IST

बुलडाणा - विविध प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वात राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी संप केला. बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

बँक कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित वेतन वाढ लागू करून बँक कर्मचाऱ्यांना किमान वीस टक्के पगार वाढ देण्यात यावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, फॅमिली पेन्शनमध्ये वाढ करावी, अधिकाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करण्यात यावे या मागण्यांसाठी हा संप करण्यात आला.

हेही वाचा - शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प; सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया

बुलडाणा येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणा देऊन बँक कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. स्टेट बँक युनियनचे क्षेत्रीय सचिव अविनाश बोचरे, स्टेट बँक अधिकारी संघटनेचे सिद्धार्थ पवार, सारंग संघवे, बँक ऑफ इंडियाचे आशिष टेकाडे, लिखिते, रामेश्वर जुनारे, आशिष वाढोकर, शंकर पोपटानी, संजय निंबोळकर, रोहन जिंतूरकर, शशी वखरे, राजेश कुलकर्णी, कपिल परिहार, महेश पाटील, दिगंबर तिवने, अनिल कुलकर्णी, अदिती सांगवी, राहुल वर्मा, शीतल बोरसे, अविनाश वर्मा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बँक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Intro:Body:बुलडाणा:- नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित असलेला वेतन वाढ करार तयार करून बँक कर्मचाऱ्यांना किमान वीस टक्के पगार वाढ देण्यात यावी, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू
करण्यात यावी, फॅमिली पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, अधिकाऱ्यांच्या कामाचे तास निश्चीत करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या नेतृत्वात राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने आज शनिवारी १ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

स्टेट बँक बुलडाणा मुख्य शाखा येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा स्टेट बँक चौक, तहसिल चौक, सामान्य रुग्णालय चौक, गर्दे वाचनालय भोंडे चौक, कारंजा चौक, न्यायालय चौक
मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अश्या विविध घोषणा देवून बँक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला होता. यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या मोर्चात स्टेट बँक युनियनचे क्षेत्रीय सचिव अविनाश बोचरे, स्टेट बँक अधिकारी संघटनेचे सिद्धार्थ पवार, सारंग संघवे, बँक आॅफ इंडियाचे आशिष टेकाडे, लिखीते, रामेश्वर जुनारे, आशिष वाढोकर, शंकर पोपटानी, संजय निंबोळकर, रोहन जिंतूरकर, शशी वखरे, राजेश कुलकर्णी, कपिल परिहार, महेश पाटील, दिगंबर तिवने, अनिल कुलकर्णी, अदिती सांगवी, राहुल वर्मा, शीतल बोरसे, अविनाश वर्मा यांच्यासह जिल्हाभरातील बँक कर्मचारी उपस्थित होते..

बाईट:- अविनाश बोचरे, क्षेत्रीय सचिव स्टेट बँक युनियन

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.