ETV Bharat / state

अडचणींचा सामना करूनही देशाचा 'राजा' राहणार कायम; असे आहे भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत - पंतप्रधान

भेंडवळच्या घटमांडणीला गेल्या ३०० वर्षाचा इतिहास आहे. या घटमांडणीतून विविध भाकीते वर्तवण्यात येतात. मात्र ती कितपत खरी ठरतात हा संशोधनाचा विषय आहे. अडचणींचा सामना करुनही देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहील असे भाकीत आज या घटमांडणीतून वर्तवण्यात आले.

भेंडवळची घटमांडणी
author img

By

Published : May 8, 2019, 8:27 AM IST

बुलडाणा - राज्यभरात सुप्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत आज जाहीर करण्यात आले. या भाकीतातून आर्थिक संकटासह नैसर्गिक संकटांचाही देशाला सामना करावा लागणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. पावसाचा अंदाज सर्वसाधारण राहणार असून पीकही साधारण राहणार आहे. देशाचा 'राजा' अर्थात पंतप्रधान कायम राहणार असून त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे भाकीतही या घटमांडणीतून करण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीला 300 वर्षाचा इतिहास आहे. येथील पुंजाजी महाराजांनी अक्षय तृतीयेच्या सायंकाळी या घटाची मांडणी केली होती. आज परंपरेनुसार या घटनांचे भाकीत वर्तवण्यात आले. त्यात पुंजाजी महाराज यांनी घटात ठेवण्यात आलेल्या विविध धान्याच्या राशींवरून भाकीत वर्तवले. देशावर होणारे दहशतवादी हल्ले कमी होणार नाहीत. मात्र दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी देशाचे संरक्षण खाते सक्षम राहील, असे भाकीतही घटमांडणीतून वर्तवण्यात आले आहे.

भेंडवळची घटमांडणी
यावर्षी पावसाळा साधारण राहणार आहे. त्यामुळे पीकही साधारण असतील असेही पुंजाजी महाराज यांनी यावेळी भाकीत वर्तवले. ज्वारीचे पीक सर्वसाधारण राहणार असून चांगला भाव मिळणार आहे. तुरीच्या भावात तेजी असणार आहे. मूग, उडीद आणि तीळ मोघम असल्याने पीक जेमतेम राहील. बाजरीच्या पिकाचे उत्पन्न चांगले तसेच भावात तेजी असणार आहे. तांदळाचे पीक मोघम असणार आहे. जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभऱ्याचे पीकही सर्वसाधारण राहील.

पावसाळा

पावसाळ्याचा पहिला महिना जेमतेम राहील, दुसरा महिना चांगला, तिसरा महिना जेमतेम राहणार आहे. यात अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे. नैसर्गिक आपत्तीचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यासह समुद्र किनारपट्टी भागात आपत्तीचे संकेत देण्यात आले आहेत. जनावरांना चाराटंचाई भासणार आहे. तर नागरिकांना आर्थिक चणचण भासणार असल्याचेही या घटमांडणीतून वर्तवण्यात आले आहे.

Intro:Body:

अडचणींचा सामना करूनही देशाचा 'राजा' राहणार कायम; असे आहे भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत

बुलडाणा - राज्यभरात सुप्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत आज जाहीर करण्यात आले. या भाकीतातून आर्थिक संकटासह नैसर्गिक संकटांचाही देशाला सामना करावा लागणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. पावसाचा अंदाज सर्वसाधारण राहणार असून पीकही साधारण राहणार आहे. देशाचा 'राजा' अर्थात पंतप्रधान कायम राहणार असून त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे भाकीतही या घटमांडणीतून करण्यात आले.  

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीला 300 वर्षाचा इतिहास आहे. येथील पुंजाजी महाराजांनी अक्षय तृतीयेच्या सायंकाळी या घटाची मांडणी केली होती. आज परंपरेनुसार या घटनांचे भाकीत वर्तवण्यात आले. त्यात पुंजाजी महाराज यांनी घटात ठेवण्यात आलेल्या विविध धान्याच्या राशींवरून भाकीत वर्तवले.

देशावर होणारे दहशतवादी हल्ले कमी होणार नाहीत. मात्र दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी देशाचे संरक्षण खाते सक्षम राहील, असे भाकीतही घटमांडणीतून वर्तवण्यात आले आहे.

यावर्षी पावसाळा साधारण राहणार आहे. त्यामुळे पीकही साधारण असतील असेही पुंजाजी महाराज यांनी यावेळी भाकीत वर्तवले. ज्वारीचे पीक सर्वसाधारण राहणार असून चांगला भाव मिळणार आहे. तुरीच्या भावात तेजी असणार आहे. मूग, उडीद आणि तीळ मोघम असल्याने पीक जेमतेम राहील. बाजरीच्या पिकाचे उत्पन्न चांगले तसेच भावात तेजी असणार आहे. तांदळाचे पीक मोघम असणार आहे. जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभऱ्याचे पीकही सर्वसाधारण राहील.

पावसाळा

पावसाळ्याचा पहिला महिना जेमतेम राहील, दुसरा महिना चांगला, तिसरा महिना जेमतेम राहणार आहे. यात अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे. नैसर्गिक आपत्तीचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यासह समुद्र किनारपट्टी भागात आपत्तीचे संकेत देण्यात आले आहेत. जनावरांना चाराटंचाई भासणार आहे.  तर नागरिकांना आर्थिक चणचण भासणार असल्याचेही या घटमांडणीतून वर्तवण्यात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.