ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद, ठिकठिकाणी राजकीय पक्ष, शेतकरी संघटना उतरल्या रस्त्यावर - भारत बंदला प्रतिसाद

कृषी कायद्याविरोधात आज मंगळवारी देण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेमध्ये बुलडाण्यातही सकाळपासून बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. संपूर्ण शहरासह महात्मा फुले मार्केटमधील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून बंदमध्ये सहभाग नोंदविला.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : Dec 8, 2020, 10:51 PM IST

बुलडाणा - कृषी कायद्याविरोधात आज मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संपूर्ण प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहवायला मिळाला. राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना शांततेत निषेध व्यक्त करत आंदोलन करीत आहेत. जिल्ह्यात सकाळपासून व्यापाऱ्यांनी आप-आपले प्रतिष्ठाने, ऑटो युनियन यांच्यासह अनेकांनी कडकडीत बंदमध्ये आपला सहभाग नोंदविला.

बुलडाणा

कृषी कायद्याविरोधात आज मंगळवारी देण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेमध्ये बुलडाण्यातही सकाळपासून बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. संपूर्ण शहरासह महात्मा फुले मार्केटमधील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून बंदमध्ये सहभाग नोंदविला. कडकडीत बंद ठेवण्यासाठी महाविकास आघाडी, भारिप बहुजन महासंघ आणि शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरात बाईक रॅलीत फिरून दुकाने आणि आठवडी बाजार बंद करण्याचे आवाहन केले. यांनतर त्यांच्याकडून जयस्तंभ चौकात रस्ता रोको करण्यात आला.

मलकापूर-सोलापूर मार्ग बैलगाड्या आडव्याकरून शेतकऱ्यांनी रोखला-

वाघजाळ फाट्याजवळ मलकापूर-सोलापूर मार्गावर महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते व शेतकरी बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. यावेळी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, अशी मागणी करीत बैलगाडीवरील ज्वारीचा कडबा पेटवून निषेध व्यक्त केला. आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत, केंद्र सरकारने तत्काळ शेतकरी विरोधी कायदा रद्द केला नाही तर राज्यात आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन-

आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान ब्रिगेड यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय राज्यव्यापी निषेध सभा व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी व कामगार विरोधी विधेयके रद्द करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्या सह विविध किसान संघटनांनी व वकील संघटनांनी सहभाग नोंदवला. यावेळी आंदोलनस्थळी विविध स्वरुपात शेतकरी आंदोलन समर्थनात गाणी म्हणून केंद्र सरकारचे डोळे उघडण्यासाठी गीत म्हणण्यात आले.

शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर उतरले रस्त्यावर-

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, अशी मागणी करीत शिवसेनेचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्यासह शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते व शेतकरी रस्त्यावर उतरून मेहकर शहरातून जाणारा नागपूर-मुंबई महामार्ग काही काळ रोखून धरला होता. यावेळी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. तिन्ही कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा भविष्य काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, याच्यामध्ये मोठ्या कंपन्या असतील, मोठे कॉर्पोरेट जगत असेल तर श्रीमंत व्यापाऱ्यांना याचा लाभ पुढच्या काळामध्ये होणार आहे. म्हणून हा व्यापाऱ्यांसाठी बनवलेला कायदा आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या शेतकऱ्याच्या भारत बंदला शिवसेना पक्षाने स्वयंस्फूर्त पाठींबा दिलेला आहे आणि शिवसेनेचाच पाठींबा असल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शेगावातही कडकडीत बंद-

कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेगावात सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आले. यासाठी महाविकास आघाडी, भारिप बहुजन महासंघ आणि शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरात बाईक रॅली काढून दुकाने आणि आठवडी बाजार बंद केल्या. यांनतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.