बुलडाणा - भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीच्या निकालाची परंपरा या वर्षीसुद्धा कायम राहिली आहे. बारावी विज्ञान शाखेच्या २२७ विद्यार्थ्यांपैकी २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.५५ टक्के एवढी लागली आहे. कलाशाखेच्या ६९ विद्यार्थ्यांपैकी ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याचा निकाल ९५.६५ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून भारत विद्यालयाची विद्यार्थिनी रितिका किशोर पाटीलने ९२ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. व्दितीय प्रीती सुनील पाटील ९०.५% तर तृतीय तहसिन कौसर मो.साजीद ८७.५ टक्के गुण घेऊन भारत विद्यालयातून गुणवंत विद्यार्थी ठरले आहेत.
क्रॉप सायन्समधून योगेश किशोर कोलते यास ८८.८ टक्के गुण, कॉम्प्युटर सायन्स मधून अनुष्का विलास सुपे ८८.५ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. भारत विद्यालयाच्या विज्ञान शाखेसोबतच कला शाखेचा सुद्धा निकाल उत्तम लागलेला असून कला शाखेतून ओम समाधान हांडे या विद्यार्थ्यांला ९१. ८४ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. ओम हांडे याला ६५० पैकी ५७९ गुण मिळाले आहेत. तसेच निलेश कैलास चव्हाण या विद्यार्थ्यांला ९० टक्के, माधुरी संजय गवई ८७.७ टक्के ,विजय तेजराव नप्ते ८७.२ टक्के, मनिषा गजानन अहिर ८६.२ टक्के गुण घेऊन शाळेच्या गुणवत्ता यादीत आले आहेत.
भारत विद्यालयातील ४६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीतउत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीमध्ये १८१ विद्यार्थी, ६४ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा संस्था अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, मुख्याध्यापक एस.आर.उन्हाळे, उपमुख्याध्यापक रामेश्वर पालवे, पर्यवेक्षक मोहन घोंगटे यांच्या समवेत सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.