बुलढाणा : जिल्ह्यातील मोती मशिद मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करत, बकरी ईद साजरी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आज बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने, हिंदू बांधवांसाठी जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी हिंदु मुस्लिम बांधवांच्या सणामध्ये दुहेरी योग साधत, हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले आहे.
सर्व स्तरातून निर्णयाचे स्वागत : आज 29 जून रोजी बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी कुर्बानी देऊन हा सण साजरा केला. मात्र हिंदू धर्मियांची पवित्र आषाढी एकादशी यास दिवशी असल्याने, या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय बुलडाणा जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून केले जात आहे.
सामाजिक बांधिलकी जपली : बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ, यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्वच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक, मशीद व दर्गाचे विश्वस्त आणि मौलवींची बैठक घेतली होती. यावेळी उपस्थित प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून, या दिवशी राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्व कायम राहण्यासाठी पुढाकार घेतला. 13 ही तालुक्यातील बकरी ईदला मुस्लिम समाजाने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम बांधवांनी सर्वानुमते घेतलेली या निर्णयाचे स्वागत होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा : आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तिमय वातावरण असून विठू नामाचा जयघोष होत आहे.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य शासकीय पूजा करण्यात आली. आषाढीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांसाठी प्रशासनाने देखील अनेक सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे.
हेही वाचा -
- Solapur Balloons: ईदगाह मैदानासमोर पाकिस्तान समर्थनार्थ फुग्यांची विक्री; मुस्लिमांना बदनाम करण्याचे षडयंत्र एमआयएमचा आरोप
- Asahadi Ekadashi 2023: हिंदू-मुस्लिम एकजुटीचे दर्शन, कोल्हापूरकरांनी जपला सामाजिक सलोखा
- Ashadhi Ekadashi 2023 वारकऱ्यांवर मशिदीतून पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी घेतला वारीमध्ये सहभाग हिंदू मुस्लिम धर्मियांच्या एकतेचे दर्शन