ETV Bharat / state

कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी आंदोलन - बुलडाणा कोरोना अपडेट

आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यात यावे, अंशकालीन कर्मचारी घोषित करून शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोना कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज (१८ डिसेंबर) कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालसमोर निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : Dec 18, 2020, 10:24 PM IST

बुलडाणा - कोरोना काळात आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यात यावे, अंशकालीन कर्मचारी घोषित करून शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोना कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज (१८ डिसेंबर) कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालसमोर निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

बुलडाणा

कायमस्वरूपी किंवा एनआरएचएममध्ये समायोजन करण्याची मागणी -

राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली. कोरोनासारख्या महामारीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्याच्या आरोग्य विभागात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा दिली. अशा परिस्थितीत कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात गावातील लोकांनी व नातेवाईकांनी तुच्छ वागणूक दिली, कठीण काळात कर्तव्य बजावले. कोरोना काळातील कंत्राटी पद्धतीची नियुक्ती संपुष्टात येत असून आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हा सर्वांना आरोग्य विभागातील रिक्त पदी नेमणूक करून कायमस्वरुपी किंवा एनएचएम रोजगाराची संधी उपलबध करून द्यावी, तसेच येणाऱ्या काळात कोरोना लसीकरणासाठी प्रशिक्षण देऊन कामाची संधी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र ‘गरज सरो वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होताच, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका घेतली आहे. ही पूर्णत: चुकीची असून संकट काळामध्ये राज्याच्या आरोग्यविभागाला साथ देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पात्रतेनुसार रिक्त पदांवर नियुक्ती आदेश देण्यात यावेत किंवा किमान ११ महिन्याच्या कंत्राटी आदेश देवून हळूहळू रिक्त होणाऱ्या जागांवर कायम नियुक्ती देण्यात यावी.

९० दिवस काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र

यासह राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान ९० दिवस काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र वापर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ५० टक्के आरोग्य सेवेत यामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे कोविड १९ नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत ज्यांनी कोविड १९ आरोग्य कर्मचारी म्हणून कमीत कमी ९० दिवस तीन महिने असेल त्यांना शासनाने आरोग्य विभागातील सर्व पदासाठी ५० टक्के आरक्षण दिले पाहिजे, हंगामी फवारणी सारख्या केंद्रशासनाच्या तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागात व इतर विभागात जागा राखीव ठेवण्यात यावे, आरोग्य विभागातील भरती निघत नाही तोपर्यंत एनआरएचएममध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे शिक्षणाच्या आधारे रिक्त असणाऱ्या पदावर १०० टक्के समायोजन करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. आंदोलन करताना शेख जहीर शेख शब्बीर, पायल मोरे, किरण भांदुर्गे, स्नेहा मोरे ,पूजा मुळेकर, पल्लवी जाधव, प्रतीक्षा मोरे, अंजली चोपडे, स्वाती राठोड ,निकिता वानखेडे ,अनिता खरे , सतीश गवळी, मयुर अंभोरे ,प्रकाश डोंगरे ,अक्षय गवळी, शेख वसीम ,गोपाल सुरोशे, विजय मोरे, अशोक मुंडे, बुद्धभूषण सरकटे, भूषण रावे, नरसिंग जायभाय,दयानंद गवई, अमोल गवई यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.