बुलढाणा : आज त्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी सोनेवाडी येथे आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील सैनिक रवींद्र पांडुरंग राखोंडे, वय 26, असे मृत जवानाचे नाव असून, ते नांदेड येथे सन 2016 मध्ये भरती झाले होते.
जवान या ठिकाणी होते कार्यरत : सध्या ते पंजाब येथे आपले कर्तव्य बजावत होते. सध्या 1 जानेवारीला तो घरी सोनेवाडी येथे सुटीवर घरी आले होते. यावेळी दुःखद वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, चार बहिणी, पत्नी अनी एक वर्षाचा मुलगा आहे.
त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात केले अंत्यसंस्कार : अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या जवानाचा त्याच्या मूळ सोनेवाडी या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. महिन्यापूर्वी गावी आला असताना मोटार सायकलचा अपघात झाला होता. पुणे येथे उपचरादरम्यान या जवानाने अखेरचा श्वास घेतला.