ETV Bharat / state

अजब...प्रचारासाठी उमेदवाराच्या मुलाने चक्क घरावर ठेवला ऑटोरिक्षा

author img

By

Published : Jan 9, 2021, 8:13 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार नवीन क्लुप्त्या लढवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुटाळा बु. येथील वॉर्ड क्र. २ मधील एका उमेदवाराच्या मुलाने निवडणूक चिन्ह असलेला खराखुरा ऑटोरिक्षा चक्क घराच्या छतावर दर्शनी भागात ठेवला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rickshaw on the house sutala
रिक्षा घराच्या छतावर सुटाळा

बुलडाणा - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार नवीन क्लुप्त्या लढवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक क्लुप्ती जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुटाळा बु. येथील वॉर्ड क्र. २ मधील एका उमेदवाराने आजमावली आहे. उमेदवाराच्या मुलाने निवडणूक चिन्ह असलेला खराखुरा ऑटोरिक्षा चक्क घराच्या छतावर दर्शनी भागात ठेवला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माहिती देताना उमेदवार गीताबाई मनोहर रहाटे

मुलाकडून आईचा अनोखा प्रचार

खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथील वॉर्ड क्र. २ मधील प्रगती पॅनलच्या उमेदवार गीताबाई मनोहर रहाटे यांचे निवडणूक चिन्ह ऑटो असून, त्यांच्या मुलाने घराच्या छतावर चक्क खराखुरा ऑटोच नेवून ठेवला आहे. हा ऑटो छतावर नेण्याकरीता क्रेनची मदत घेण्यात आली. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी या ऑटोवर आकर्षक लाइटींग लावल्याने नागरिकांचे त्याकडे लक्ष जाते. निवडणुकीचे चिन्ह ऑटो असून चक्क खराखुरा ऑटो छतावर नेल्याने ते पाहण्यासाठी गावातील नागरिक गर्दी करताना दिसून आले. तर, गावाचा विकास करण्यासाठी आपण निवडणुकीला उभे असून मतदारांनी त्याचा विचार करावा, असे मत उमेदवार गीताबाई यांनी व्यक्त केला. गीताबाई यापूर्वीही निवडून आलेल्या आहेत.

हेही वाचा - पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बुलडाण्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.