ETV Bharat / state

५० एचआयव्हीग्रस्त जोडप्यांनी थाटले संसार, नेटवर्क ऑफ बुलडाणाचा उपक्रम

एचआयव्ही संसर्गित रुग्णांची संस्थेत वेळोवेळी तपासणी केली जाते. त्यांना औषधोपचार मिळवून दिला जातो. त्याचबरोबर, शासनाच्या सर्व योजना रुग्ण व त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संस्था काम करते. तसेच, एचआयव्ही ग्रस्त रुग्णांच्या मुलांसाठी महिला व बालकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील २३७ मुलांना बालसंगोपणासाठी महिण्याला ५०० रुपये लाभ मिळवून देण्यात आला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Oct 19, 2020, 5:21 PM IST

बुलडाणा- नेटवर्क ऑफ बुलडाणा या संस्थेने जिल्ह्यात ५० एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे संसार थाटले आहे. यात २० आंतरजातीय विवाह, २० विधवांचे पुनर्वसन, तर एकाच समाजतील १० युवक-युवतींचे संसार थाटण्यात आले आहे.

नेटवर्क ऑफ बुलडाणा ही संस्था गेल्या बारा वर्षापासून एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या विवाहासाठी जिल्हाभर काम करत आहे. दुर्दैवाने एचआयव्हीच्या विळख्यात अडकलेल्या अनेक युवक आणि युवतींच्या आयुष्यात उदासवाणे जीवन येते. हताश झालेल्या या रुग्णांच्या जीवनाला नव्याने उभारी देण्याचे काम नेटवर्क ऑफ बुलडाणा संस्थेतील कर्मचाऱ्यांनी हाती घेतले आहे.

माहिती देताना नेटवर्क ऑफ बुलडाणाचे गजानन जयभाये

एचआयव्ही संसर्गित रुग्णांची संस्थेत वेळोवेळी तपासणी केली जाते. त्यांना औषधोपचार मिळवून दिला जातो. त्याचबरोबर, शासनाच्या सर्व योजना रुग्ण व त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संस्था काम करते. तसेच, एचआयव्ही ग्रस्त रुग्णांच्या मुलांसाठी महिला व बालकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील २३७ मुलांना बालसंगोपणासाठी महिण्याला ५०० रुपये लाभ मिळवून देण्यात आला आहे. या कार्यासाठी संस्थेचे सहा कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

प्रत्येकाचे मरण अटळ आहे. मात्र, जोपर्यंत हृदयाचे स्पंदन सुरू आहे, तोपर्यंत विवाह बंधनात राहून एकमेकांचा आधार होऊन जीवन जगता येऊ शकते, हेच या संस्थेच्या माध्यमातून सिद्ध होते. दरम्यान, विवाह बंधनात अडकेलेली सर्व जोडपी आजरोजी वेळेवर औषधोपचार घेऊन आपल्या वैवाहिक जीवनात यशस्वी ठरली आहेत.

हेही वाचा- ठाकरे, फडणवीस सरकारची 'फसवी कर्जमाफी', शेतकऱ्याने लावला डिजिटल बोर्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.