ETV Bharat / state

कार व कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक.. चार जण जागीच ठार - अकोला कार कंटेनर अपघात

अकोल्यातून खामगाव येथे कामानिमित्त गेलेल्या चौघांचा परत येताना पिंपराळा फाट्याजवळ सायंकाळी अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चौघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. राहुल सातळे, विनोद शंकरराव बावने, पप्पू मनोहर जोशी, अतुल वसंतराव व्यवहारे अशी मृतांची नावे आहेत.

4 people death in  car accident in akola
कंटेनरची कारला जोराची धडक, चौघांचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Aug 2, 2020, 8:39 PM IST

बुलडाणा - अकोल्यातून खामगाव येथे कामानिमित्त गेलेल्या चौघांचा परत येताना पिंपराळा फाट्याजवळ सायंकाळी अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चौघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. राहुल सातळे, विनोद शंकरराव बावने, पप्पू मनोहर जोशी, अतुल वसंतराव व्यवहारे अशी मृतांची नावे आहेत.

अकोल्यातील जुने शहरातील शिवनगर येथे राहणारे राहुल सातळे व इतर 3 जण कारमधून खामगाव येथे कामानिमित्त गेले होते. खामगाव येथून परत येत असताना कारला (कार क्रं. एमएच 27 एआर 3632) समोरून येणाऱ्या कंटेनरने (क्रं.आरजे 18 जीबी 2559) पिंपराळा फाट्याजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात अल्टो कारचा चालक राहुल सातळे, पप्पू मनोहर जोशी, अतुल वसंतराव व्यवहारे व विनोद शंकरराव बावणे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या चौघांचा मृतदेह खामगाव शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीला पाठविण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्याचे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.