बुलडाणा - शहरात अंगणवाडीतील 3 बालकांचे अपहरण करण्यात आल्याची घटना 15 जुलैला घडली होती. या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली आहे.16 जुलैच्या रात्रीपासून पोर्णिमेस प्रारंभ होते असल्यामुळे नरबळीसाठीस या मुलांचे अपहरण करण्याची आले असल्याची शंका वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून अजूनही त्या मुलांचा पत्ता लागलेला नाही.
बुलडाणा शहरातील गौळीपूरा भागात राहणारे हनीफ शेख यांची एक नात आणि दोन नातू 14 जुलैला नेहमीप्रमाणे जवळच्याच अंगणवाडी केंद्रात गेले होते. दुपारी 12 वाजेपर्यंत ते तिघे घरी येणे अपेक्षित होते. मात्र, एक वाजून गेला तरी ते परतले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन पाहिले असता ते तिघेही तिथे आढळून आले नाहीत. आजूबाजूला त्यांची शोधाशोध केली मात्र, ते कोठेच सापडत नसल्याने शेवटी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्या तिन्ही मुलांचे अपहरण झाल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच गौळीपुरा परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याची तपासणीही केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून काही तृतीयपंथी शहरात संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले होती. मात्र, तेसुद्धा अचानक गायब झाल्याने पोलीस त्याचासुद्धा तपास करत आहेत. अपहरण झालेल्या बालकांपैकी अहिल आणि अजीम हे दोघे मुळचे परतवाडा जिल्ह्यातील असून सुट्टीसाठी मामाच्या गावी आले होते. मामाची मुलगी सहर हिच्यासोबत ते अंगणवाडीत गेले होते. त्यानंतर ते तिघे परतलेच नाहीत. या प्रकरणी कोणालाही माहिती असल्यास त्यांनी बुलडाणा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यासाठी अपहरण झालेल्या बालकांचे छायाचित्रही पोलिसांनी जारी केले आहे.