ETV Bharat / state

बुलडाण्यातील 527 ग्रामपचायतींमध्ये 13 हजार 625 अर्ज दाखल

बुलडाण्यातील 13 तालुक्यातील 527 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायत निवडणुकीत 13 हजार 362 उमेदवारांनी 13 हजार 625 अर्ज दाखल केले आहेत.

13-thousand-625-applications-filed-in-527-gram-panchayats-in-buldana
बुलडाण्यातील 527 ग्रामपचायंतीमध्ये 13 हजार 625 अर्ज दाखल
author img

By

Published : Dec 31, 2020, 9:00 PM IST

बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी 30 डिसेंबर रोजी 13 हजार 362 उमेदवारांनी 13 हजार 625 अर्ज दाखल झाले आहे.

527 ग्रामपंचायतीत 13 हजार 625 अर्ज दाखल -

बुलडाण्यातील 13 तालुक्यातील 527 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होताच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायतीमध्ये आदर्श आचारसंहीतेच्या पालनासह उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायत निवडणुकीत 13 हजार 362 उमेदवारांनी 13 हजार 625 अर्ज दाखल केले आहेत.

बुलढाणा तालुक्यातील दाखल अर्ज -

बुलडाणा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीमध्ये 1 हजार 572 उमेदवारांनी 1 हजार 609 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्याखालोखाल चिखली तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीमध्ये 1 हजार 447 उमेदवारांनी 1 हजार 487 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. देऊळगावराजात 26 ग्रामपंचायतीमध्ये 597 उमेदवारांनी 648 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील दाखल अर्ज -

सिंदखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीमध्ये 956 उमेदवारांनी 992 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. मेहकर तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीमध्ये 1 हजार 153 उमेदवारांनी 1 हजार
162 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. लोणार तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीमध्ये 424 उमेदवारांनी 425 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

खांमगाव तालुक्यातील दाखल अर्ज -

खामगाव तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीमध्ये 1 हजार 804 उमेदवारांनी 1 हजार 843 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. शेगाव तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीमध्ये 800 उमेदवारांनी 816 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

जळगांव जामोद तालुक्यातील दाखल अर्ज -

जळगाव जामोद तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीमध्ये 654 उमेदवारांनी 661 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. संग्रामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीमध्ये 742 उमेदवारांनी 742 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. मलकापूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीमध्ये 757 उमेदवारांनी 757 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

नांदुरा तालुक्यातील दाखल अर्ज -

नांदुरा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीमध्ये 1 हजार 184 उमेदवारांनी 1 हजार 188 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

मोताळा तालुक्यातील दाखल अर्ज -

मोताळा तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीमध्ये 1 हजार 272 उमेदवारांनी 1 हजार 292 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. असे एकूण 13 हजार 362 उमेदवारांनी 13 हजार 625 नामनिर्देशन पत्र जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दाखल झाले आहे. 23 डिसेंबर पासून 30 डिसेंबरपर्यंत आठ दिवस नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत होती.

मेहकर तालुक्यातील बिनविरोध निवडणूक -

मेहकर तालुक्यातील लावणा ग्रामपंचायत निवडणूक अविरोध झाली आहे. मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी ग्रामपंचायत निवडणूक अविरोध झाल्यास त्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी 25 लाखांचा निधी देण्याचे घोषीत केले होते. लावणा ग्रामस्थांनी निवडणूक अविरोध करुन हा बहुमान मिळवला आहे. सोबतच 25 लक्ष रुपयाचा विकास निधी मिळवण्याचे मानकरी ठरले आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर लोकप्रतिनिधींनी घोषीत केलेले 25 लाख रुपयाचा विकास निधी आणखी किती ग्रामपंचायतीस हा बहुमान मिळतो हे येत्या दोन दिवसात समजले.

हेही वाचा - केंद्र सरकारकडून देशभरातील सरकारी रुग्णालयांना ३६ हजार व्हेंटिलेटरचा पुरवठा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.