बुलडाणा- विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर ठिकाण हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. आधी 40 आणि आज 11 कोरोनाबधितांची नोंद करण्यात झाली आहे. तर लोणार तालुक्यातील ब्राम्हणचिकना येथील एक कोरोनाबाधित, असे आज एकूण 12 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये भीमनगर, मलकापूर येथील 16 व 20 वर्षीय तरुणी, 9 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय पुरूष रुग्ण आहेत. तसेच पारपेठ, मलकापूर येथील 43 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय पुरुष, हेडगेवार नगर, मलकापूर येथील 36 वर्षीय पुरुष, धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध महिला, 62 वर्षीय वृद्ध पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे हनुमान चौक, मलकापूर येथील 8 महिन्याचे बाळ व 27 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. लोणार तालुक्यातील ब्राम्हणचिकना येथील 30 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशाप्रकारे 132 कोरोना अहवालांपैकी 120 अहवाल निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्याचप्रमाणे आज 4 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये शेलापूर, ता. मोताळा येथील 50 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, मच्छी ले आऊट, बुलडाणा येथील 36 वर्षीय पुरुष व भीमनगर, मलकापूर येथील 25 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यंत 81 कोरोनाबाधित रुग्ण निगेटिव्ह असल्याने त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 44 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आतापर्यंत 1 हजार 872 कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 130 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबधितांची संख्या ही 125 आहे. तसेच आज आलेल्या 132 अहवालांपैकी 18 अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण 1 हजार 872 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.