ETV Bharat / state

शासकीय योजनांच्या नावाने वृद्ध महिलांची लूट, आरोपी महिलेला अटक

विविध शासकीय योजनांचा फायदा मिळवून देते, असे सांगून  वयोवृद्ध महिलांना लुटणाऱ्या आरोपी महिलेला तुमसर पोलिसांनी अटक केली आहे. वृद्ध महिलांना लुटल्याची कबुली आरोपी महिलेने दिली आहे.

आरोपी महिलेला अटक
author img

By

Published : Nov 17, 2019, 6:07 AM IST

भंडारा - विविध शासकीय योजनांचा फायदा मिळवून देते, असे सांगून वयोवृद्ध महिलांना लुटणाऱ्या आरोपी महिलेला तुमसर पोलिसांनी अटक केली आहे. वृद्ध महिलांना लुटल्याची कबुली आरोपी महिलेने दिली आहे.

शासकीय योजनांच्या नावाने वृद्ध महिलांची लूट, आरोपी महिलेला अटक

मागील तीन महिन्यात तुमसरमध्ये वयोवृद्ध महिलांची शासकीय योजनांच्या नावाने फसवणूक करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील कुटीपार गावातील 49 वर्षीय निशिगंधा उर्फ ज्योती गोपीचंद रामटेके या महिलेला तिच्या राहत्या घरून अटक केली.

तुमसर येथील सुलोचना घोडीचोर या 60 वर्षीय वृद्ध महिलेला एका सार्वजनिक कार्यक्रमात आरोपी महिला भेटली. श्रावण बाळ योजनेचे तुला लाभ मिळतो का? असे विचारले. त्यानंतर मी तुला 1 लाख 80 हजार रुपये मिळवून देते, असे सांगितले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने तिच्याकडील 14 हजार रुपये व 3 ग्रॅम सोन्याची गरसुळी दिली. त्यानंतर तुझा अर्ज घेऊन येते, असे सांगून आरोपी महिला निघून गेली. त्यानंतर आरोपी महिला परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेने तुमसर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.

याचप्रकारे आरोपी निशिगंधा हिने एका वृद्ध महिलेलादेखील पतीच्या मृत्युचे 40 हजार रुपये व तुला 20 हजार रुपये मिळवून देते, असे सांगून तिच्याकडून दागिने उकळले होते. तर एका वृद्ध महिलेला विधवा योजनेचे पैसे मिळवून देते, असे सांगून तिच्याकडील दागिने लुटूले होते. याचबरोबर शासनाकडून बांधकाम साहित्याची पेटी मिळाली आहे. त्यातील 8 हजार रुपये मिळवून देते, असे एका महिलेला सांगून तिच्याकडील दागिने सुद्धा या आरोपी महिलेने लुबाडून नेले होते.

वृद्ध महिलांना लुबाडणाऱ्या आरोपी महिलेविरुद्ध 550/ 19 कलम 420 भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पद्धतीची फसवणूक जिल्ह्यातील विविध तालुक्यात यापुर्वीही झाली होती. या सर्व घटनांमध्ये या महिलेचे काही संबंध आहेत का किंवा हिचा कोणत्या टोळीशी संबंध आहे का, याचा तपास सध्या पोलीस करीत आहे.

Intro:Body:Anc : विविध शासकीय योजनांचा फायदा मिळवून देतो असे सांगून वयोवृद्ध महिलांना लुटणाऱ्या महिलेला तुमसर पोलिसांनी अटक केली आहे आत्तापर्यंत या महिलेने तुमसर मध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी या वृद्ध महिलांना लुटल्याची कबुली दिली आहे या महिलेने अजूनही लोकांना फसविले आहे का कुठल्या टोळीशी संबंध आहे का याचा तपास तुमसर पोलीस घेत आहेत.
मागील तीन महिन्यात तुमसर मध्ये वयोवृद्ध महिलांची योजनांच्या नावाने फसवणूक करण्याच्या घटनेत वाढ झाली होती पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली होती विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील कुटीपार गावातील 49 वर्षिय निशिगंधा उर्फ ज्योती गोपीचंद रामटेके हिला तिच्या राहत्या घरून अटक केली आहे.
तुमसर येथील सुलोचना घोडीचोर ही 60 वर्षीय वृद्ध महिला एका सार्वजनिक कार्यक्रमात नाश्ता खात असतांना आरोपीने तिला श्रावण बाळ योजनेचे तुला लाभ मिळतो का मी तुला एक लाख 80 हजार रुपये मिळवून देतो असे सांगितले त्यासाठी तिची फोटो लागेल असं सांगून फोटोसाठी घरी गेल्यावर आरोपीने फिर्यादी ला यासाठी काही खर्च येईल असे सांगितले फिर्यादीने तिच्याकडील 14 हजार रुपये व तीन ग्रॅम सोन्याची गरसुळी दिली तुझा फॉर्म घेऊन येतो असे सांगून ती महिला निघून गेली. ती परत न आल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेने आरोपीविरुद्ध तुमसर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली अशाच पद्धतीने आरोपी निशिगंधा हिने एका वृद्ध महिलेला पतीच्या मृत्युचे 40000 रुपये व तुला 20000 रुपये मिळवून देतो असं सांगून त्यासाठी सात हजार रुपये खर्च येईल असे सांगून तिच्याकडून दागिने नेले तर एका म्हातारीला विधवा स्त्रीचे पैसे मिळवून देतो असे सांगून तिच्याकडील दागिने लुटून नेले चौथ्या महिलेला शासनाकडून बांधकाम साहित्याची पेटी मिळाली आहे त्यातील आठ हजार रुपये मिळवून देतो असे सांगून तिच्याकडील दागिने सुद्धा या आरोपी महिलेने लुबाडून नेले होते.
वृद्ध महिलांना लुबाडणाऱ्या या महिलेविरुद्ध 550/ 19 कलम 420 भादवि नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केले आहे. अशा पद्धतीची फसवणूक जिल्ह्यातील विविध तालुक्यात या अगोदरही झाली असल्याने या सर्व घटनांमध्ये या महिलेचे काही संबंध आहेत का किंवा हिचा कोणत्या टोळीशी संबंध आहे का याचा तपास सध्या पोलिस करीत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.