ETV Bharat / state

नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची स्पष्टोक्ती

author img

By

Published : Oct 7, 2020, 4:40 PM IST

काही आमदारांनी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न घेता या अधिवेशनावर होणारा खर्च विदर्भातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर करावा, अशी मागणी केली होती. याविषयी बोलताना त्यांनी हे उत्तर दिले.

भंडारा
भंडारा

भंडारा - दरवर्षी होणारे हिवाळी अधिवेशन यावर्षीही नागपूरमध्ये होईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. काही आमदारांनी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न घेता या अधिवेशनावर होणारा खर्च विदर्भातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर करावा, अशी मागणी केली होती. याविषयी बोलताना त्यांनी हे उत्तर दिले.

नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची स्पष्टोक्ती

मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मार्च महिन्यातील अधिवेशन थांबवण्यात आले होते. त्यानंतर मात्र ३ दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्यात आले आणि त्याच अधिवेशनात 7 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले. मात्र, या हिवाळी अधिवेशनाला विदर्भातील बऱ्याच आमदारांनी विरोध दर्शविला आहे. हिवाळी अधिवेशन रद्द करावे, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अशा वाढत्या प्रादुर्भावामुळे अधिवेशन घेऊन त्यावर खर्च करण्यापेक्षा या अधिवेशनामध्ये लागणारा खर्च विदर्भातील कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी खर्च करावा, अशी मागणी या आमदारांनी केली आहे. यामध्ये काँग्रेसच्या आमदारांचाही समावेश आहे.

याविषयी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ७ डिसेंबरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधानसभेत केली गेली आहे. पण काही आमदारांनी आणि जनतेने हे अधिवेशन रद्द करून अधिवेशनावर खर्च केली जाणारी रक्कम विदर्भाच्या विकासावर व कोरोनाच्या रुग्णांवर करावा अशी मागणी केली आहे. खरे तर संयुक्त महाराष्ट्र जेव्हा झाला त्या करारामध्ये असे ठरवले गेले की, दरवर्षी एक अधिवेशन नागपूरमध्ये घेतले जाणार आहे आणि त्यानुसारच अधिवेशनसुद्धा रद्द करता येणार नाही आणि हा निर्णय संपूर्ण विधीमंडळांचा आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन होईल.

सध्या कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण कमी होत असून डिसेंबर महिन्यापर्यंत हे प्रमाण अजून कमी होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याला अजून दोन महिने उरले आहेत. त्यामुळे तेव्हा कोरोनाची नेमकी स्थिती काय राहील, त्या परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ. ज्या पद्धतीने पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसाचे घेतले गेले त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या परिस्थितीनुसार हे अधिवेशन किती दिवस दिवसाचे घ्यायचे, घ्यायचे की नाही हे ठरवले जाईल. त्यामुळे आज तरी हा विषय चर्चेचा नाही असे त्यांनी सांगितले. तसेच या अधिवेशनाची कालावधी ही शासनाने आणलेले बिल आणि कामकाज यानुसार ठरविला जाणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन नेमके किती दिवसाचे असेल हे सध्यातरी सांगता येणे कठीण आहे, असे त्यांनी सांगितले.

दरवर्षी या हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानभवनातील अनेक गाळे खाली करण्यात येतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घर मिळणे कठीण जाणार आहे. त्यामुळे या कोरोनाच्या काळात त्यांना राहण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतील. खरेतर ही व्यवस्था दरवर्षीच केली जाते. यावर्षीही अधिवेशन घ्यायचे असल्याने या सर्वांची व्यवस्था नकीच करू, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.