ETV Bharat / state

भंडाऱ्यातील वैशालीनगरमध्ये ९ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट, नागरिकांची भटकंती - drinking water

या परिसरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन खोदून ठेवल्याने पाण्याची समस्या उद्भवली आहे. नव्याने बसवलेल्या पाईपलाईनला जुनी पाईपलाईन जोडायची असल्याने ती खोदून ठेवली आहे.

पाणी टंचाई
author img

By

Published : Jun 22, 2019, 11:46 PM IST

भंडारा - शहरातील वैशालीनगरमध्ये मागील ९ दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शहरात पाणी टंचाई आहे. खासगी बोअरवेलही आटले आहेत. त्यात नगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे वैशाली नगरातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, प्रशासन या समस्येवर काहीही बोलण्यास तयार नाही.

भंडाऱ्यातील वैशालीनगरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

या परिसरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन खोदून ठेवल्याने पाण्याची समस्या उद्भवली आहे. नव्याने बसवलेल्या पाईपलाईनला जुनी पाईपलाईन जोडायची असल्याने ती खोदून ठेवली आहे. मात्र, पाईपलाईन जोडली नसल्याने मागील ९ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याविषयी नगर परिषद अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही.

पाण्याची अडचण असल्याने या भागात टँकर येतो. मात्र, २ दिवसातून एकदा आणि तोही केवळ २०० लिटर पाणी देतो. एवढ्या पाण्यात कुटुंबाची गरज भागविणे कठिण जाते. त्यामुळे दुरून मिळेल त्या ठिकाणावरून नागरिक पाणी भरतात. वैशालीनगर परिसरात पाणी येत नसल्याने नागरिकांनी याविषयीची तक्रार नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना केली. मात्र, नऊ दिवसानंतर ही नळाला पाणी आलेले नाही.

मागील वर्षी कमी पावसामुळे लोकांना फेब्रुवारी पासूनच पाण्याची अडचण जाणवू लागली होती. लोकांच्या खासगी विहिरी, बोरवेल आटल्या होत्या. त्यामुळे नागरिक मिळेल त्या पाण्यावर गरज भागवत होते.

Intro:Anc : भंडारा शहरातील वैशाली नगरात मागील 9 दिवसापासून नळाला अजिबात पाणी येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी मोठी भटकंती होत आहे. शहरात पाण्याची टंचाई आहे, खाजगी बोरवेल ही आटल्या आहेत, त्यातच नगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे वैशाली नगरातील लोकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे, मात्र प्रशासन या वर काहीही बोलण्यास तयात नाही.

Body:मागच्या वर्षी कमी पावसामुळे यावर्षी लोकांना फेब्रुवारी पासूनच पाण्याची अडचण जाणवू लागली, लोकांच्या खाजगी विहिरी, बोरवेल आटल्या होत्या त्यामुळे नागरिक नळाच्या मिळेल पाण्यावर पाण्यावर आपल्या पाण्याची गरज भागवीत होते. मात्र 9 दिवसापहिले अचानक नळाला पाणी येणे पूर्णपणे बंद झाले आहे नागरिकांची चांगलीच फजिती झाली.

पाण्याची अडचण असल्याने टँकर येतो मात्र 2 दिवसातून एकदा आणि तोही केवळ 200 लिटर पाणी देतो ज्यात कुटुंबाची गरज भागविणे कठिण जाते, त्यामुळे लांब दुरून मिळेल त्याठिकानावरून पाणी भरतांना दिसतात, कधी दुसऱ्या परिसरातील लोकांच्या घरातील नळावरून तर कधी परिसरातील ज्या व्यक्तीच्या घरी पाणी आहे तो परिसरातील लोकांना थोडशी मदत करतो कारण काही कालावधीनंतर त्यांची बोरवेल सुद्धा पाणी सोडतो, त्यामुळे नागरिक सकाळपासून रात्री पर्यंत पाण्याच्या शोधात फिरत राहतात, लांब दुरून पाणी मिळवून आपली तात्पुरती गरज भागवितात.

संपूर्ण शहरात मिळाला पाणी येतो मात्र वैशाली नगर या परिसरात पाणी येत नसल्याने नागरिकांनी याविषयीची तक्रार नागरिकांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना केली मात्र नऊ दिवसानंतर ही नळाला पाणी आलेलं नाही.
या परिसरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन खोदून ठेवल्याने ही समस्या उद्भवली आहे नव्याने बसवलेल्या पाईपलाईनला जुन्या पाईप लाईन जोडायची असल्याने ती खोदून ठेवली आहे मात्र ती जोडली जात नसल्याने मागील नऊ दिवसापासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे याविषयी नगर परिषद अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.