ETV Bharat / state

मोदी काका गेले.. नाना भाऊ आले, भंडाऱ्यात भाजी विक्रेत्यांची नवी शक्कल - new trick for sale peas at bhandara

भंडाऱ्यातील एका भाजी विक्रेत्याने शक्कल लढवत मोदी काका गेले नाना भाऊ आले, असे म्हणत मटार विकत आहेत. त्यांना ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मटार विकताना विक्रेते
मटार विकताना विक्रेते
author img

By

Published : Dec 5, 2019, 11:10 AM IST

Updated : Dec 5, 2019, 11:57 AM IST

भंडारा - बाजारात वस्तूंची विक्री करताना कोण कधी कोणती युक्ती लढवेल हे सांगता येत नाही. भंडाऱ्यातील मटार विक्रेत्या शेतकऱ्याने एक वेगळीच शक्कल लढविली. हे विक्रेते मोदी काका गेलेत आणि नानाभाऊ आले म्हणून मटार पन्नास रुपये मध्ये दोन किलो झाले, असे म्हणत हिरवे मटाराची विक्री सुरू केली आहे. त्यांच्या या नवीन युक्तीमुळे त्यांचे ग्राहकसुद्धा वाढले असल्याचे हे विक्रेते सांगत आहेत.

भंडाऱ्यात भाजी विक्रेत्यांची नवी शक्कल

भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांचा मोठा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विशेष करून शेतकरी वर्गात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये नाना मोठे प्रसिद्ध आहेत. नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष पद मिळाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला भंडारा शहराच्या राजीव गांधी चौकात भाजी विकणाऱ्या दोन किरकोळ विक्रेत्यांनी नाना पटोले सत्तेवर येण्याचा आनंद काही वेगळ्याच पद्धतीने साजरा केला.

राजीव गांधी चौकामध्ये शेख करीम आणि राजा खान हे दोन मित्र किरकोळ भाजी विक्रीचे काम करतात. हे दोघेही नाना पटोलोंचे चाहते आहेत. नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष पद मिळाल्याचे माहीत होताच त्यांनी नाना पटोलेंच्या नावाने मटार विकायला सुरुवात केली.

मोदी काका गेले आणि नानाभाऊ आले मटार पन्नास रुपयांत दोन किलो झाले, नानाभाऊ के बगीचे का माल, आला आला नानाभाऊ आला असे मोठ्याने ओरडत मटार विकू लागले. मटार विकण्याच्या या नवीन पद्धतीने लोकही त्यांच्याकडून मटार घेण्यासाठी गर्दी करू लागले. पूर्वी दिवसातून तीन ते चार पोते मटार विकणाऱ्या या मित्रांच्या व्यवसाय दुप्पटीने वाढला. एका ग्राहकाला ही पद्धत एवढी आवडली की त्यांनी या दोघांच्याही ज्ञानी मनी नसताना एक व्हिडिओ बनविला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांची ही पद्धत सर्वांनाच आवडू लागली आणि पाहता पाहता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात संपूर्ण व्हायरल झाला.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मोदींना विरोध करणारे साकोलीचे नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध

विधानसभेत मोठ्या नेत्यांना टक्कर देऊन नाना पटोले जिंकून आले. ते सर्वसामान्य लोकांचे आणि शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे आम्हाला चांगले दिवस येतील. त्यामुळे आम्ही नाना पटोले यांच्या नावाने कमीत कमी पैशात लोकांना भाजीपाला विकत आहोत आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात येत आहेत, असे या विक्रेत्यांनी सांगितले.

हेही वाचा - भंडाऱ्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक; 52 कोटी थकवले

Intro:Anc : बाजारात वस्तूंची विक्री करताना कोण कधी कोणती युक्ति लढवेल हे सांगता येत नाही सध्या सोशल मीडियावर वटाणे विक्रेत्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे हे विक्रेते मोदी काका गेलेत आणि नानाभाऊ आले वटाने म्हणून पन्नास रुपये मध्ये दोन किलो झाले असे म्हणून स्वतःचे हिरवे मटर विक्री करीत आहेत त्यांनी लावलेल्या नवीन युक्ती मुळे त्यांचे ग्राहक सुद्धा वाढले असल्याचे हे विक्रेते सांगत आहेत.

Body:भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे विशेष करून शेतकरी वर्गात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये नानात मोठे प्रसिद्ध आहेत रविवारी नाना पटोले यांना विधानसभा चे अध्यक्ष पद मिळाले त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंद पसरला भंडारा शहराच्या राजीव गांधी चौकात भाजी विकणाऱ्या दोन किरकोळ विक्रेत्यांनी नाना पटोले सत्तेवर येण्याचे आनंद काही वेगळ्याच पद्धतीने साजरा केला.
राजीव गांधी चौकामध्ये शेख करीम आणि राजा खान हे दोन मित्र किरकोळ भाजी विक्री चे काम करतात हे दोघेही नाना पाटलांचे चाहते आहेत नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष पद मिळाला ही माहीत होताच त्यांनी नानाभाऊ पटोले च्या नावाने वटाणे विकायला सुरुवात केली मोदी काका गेले आणि नानाभाऊ आले वटाणे पन्नास रुपयांमध्ये दोन किलो झाले, नानाभाऊ के बगीचे का माल, आला आला नानाभाऊ आला असे मोठ्याने आवाज करून त्यांचा माल विकू लागले वटाणे विकण्याच्या या नवीन पद्धतीने लोकही त्यांच्या दुकानावर येऊ लागले त्यांच्याशी संवाद साधू लागले त्यांची ही पद्धत लोकांना एवढी प्रभावित करू लागली की दिवसातून तीन ते चार पोते वटाणे विकणाऱ्या या मित्रांच्या व्यवसाय दुप्पट वाढला एका ग्राहकाला ही पद्धत एवढी आवडली की त्यांनी या दोघांच्याही ज्ञानी मनी नसताना एक व्हिडिओ बनविला आणि तो सोशल मीडियावर घातला त्याची ही पद्धत सर्वांनाच आवडू लागली आणि पाहता पाहता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला.
विधानसभेत मोठ्या नेत्यांना टक्कर देऊन नाना पटोले जिंकून आले हे सर्वसामान्य लोकांचे आणि शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे आम्हाला सुगीचे दिवस येतील आणि तोच आनंद साजरा करण्यासाठी आम्ही नाना पटोले यांच्या नावाने कमीत कमी पैशात लोकांना माल देतो आहे आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यामुळे आमचे ग्राहकही वाढलेले आहेत. असे या विक्रेत्यांनी सांगितले.
एखादी गोष्ट कशी विकायची यासाठी एमबीए मध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जाते मात्र काही विक्रेते निव्वळ अनुभवाच्या जोरावर रोजच्या घडामोडी च्या आधार घेत स्वतःच्या मालाची विक्री कशी करावी हे दाखविणारा हा व्हिडिओ आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 5, 2019, 11:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.