ETV Bharat / state

जिल्हा रुग्णालयात तुटवडा भासल्याने व्यापाऱ्यांनी केले रक्तदान! - blood donation in bhandara

सामान्य रुग्णालयाच्या रक्त पेढीत टंचाई भासत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याला साद देत मंगळवारी भंडारा शहरातील व्यापारी लोकांनी रक्तदान केले. 67 व्यापाऱ्यांनी या वेळी रक्तदान करून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या रक्तदान शिबिराला खुद्द जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन नागरिकांचे मनोबल वाढवले.

bhandara district hospital
जिल्हा रुग्णालयात तुटवडा भासल्याने व्यापाऱ्यांनी केले रक्तदान!
author img

By

Published : Oct 28, 2020, 1:49 AM IST

Updated : Oct 28, 2020, 5:17 AM IST

भंडारा - सामान्य रुग्णालयाच्या रक्त पेढीत टंचाई भासत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याला साद देत मंगळवारी भंडारा शहरातील व्यापारी लोकांनी रक्तदान केले. 67 व्यापाऱ्यांनी या वेळी रक्तदान करून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या रक्तदान शिबिराला खुद्द जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन नागरिकांचे मनोबल वाढवले.

जिल्हा रुग्णालयात तुटवडा भासल्याने व्यापाऱ्यांनी केले रक्तदान!
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येण्यावर बंदी आली. त्याचा दुष्परिणाम रक्तदान शिबिरावर झाला. रक्तदान शिबीर बंद झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू लागला. त्यामुळे गरीब रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने अडचणी वाढल्या. हे समजताच जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. मंगळवारी भंडारा शहरातील व्यापरपेठ बंद असते. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी जलराम सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले. 67 व्यापाऱ्यांनी या शिबिरात रक्तदान केले. या व्यापाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली.

Last Updated : Oct 28, 2020, 5:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.