ETV Bharat / state

गोसे धरणाची 245 मीटरची पाणीपातळी गाठणे यावर्षीही अशक्यच

author img

By

Published : Nov 14, 2019, 2:57 PM IST

गोसे धरणाची शेवटची पाणी पातळीही 245.500 मीटर एवढी आहे. यावर्षी 245 मीटरपर्यंत पाणीपातळी वाढवण्याचे नियोजन गोसे अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र, अजुनही भंडारा जिल्ह्याच्या दोन गावांचे पुनर्वसन झालेले नाही. तसेच नागपूरमधल्या एका गावाचे पुनर्वसन झालेले नाही. त्यातच 244 च्यानंतर पाण्याची पातळी वाढवताच बुडीत क्षेत्र नसलेल्या बऱ्याच क्षेत्रात पाणी शिरायला लागले.

गोसे धरण

भंडारा - सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गोसे धरणाची पाणीपातळी 245 मीटर पर्यंत गाठण्याचे यावर्षीचे उद्दिष्ट शक्य होताना दिसत नाही. 244. 300 मीटरवर पाण्याची पातळी येताच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी याचा विरोध केल्याने अधिकाऱ्यांनी 245 मीटरची पातळी गाठण्याचे ध्येय बाजूला ठेवले आहे. अधिकाऱ्यांच्या चुकलेल्या नियोजनामुळे पाण्याच्या पातळीचा फटका अबाधित क्षेत्राला बसत आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या भागातील जनता करत आहे.

गोसे धरणाची 245 मीटरची पाणीपातळी गाठणे यावर्षीही अशक्यच

हेही वाचा - ओल्या दुष्काळासाठी राजभवनावर प्रहारचा मोर्चा, बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

गोसे धरणाची शेवटची पाणी पातळीही 245.500 मीटर एवढी आहे. यावर्षी 245 मीटरपर्यंत पाणीपातळी वाढवण्याचे नियोजन गोसे अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र, अजुनही भंडारा जिल्ह्याच्या दोन गावांचे पुनर्वसन झालेले नाही. तसेच नागपूरमधल्या एका गावाचे पुनर्वसन झालेले नाही. त्यातच 244 च्यानंतर पाण्याची पातळी वाढवताच बुडीत क्षेत्र नसलेल्या बऱ्याच क्षेत्रात पाणी शिरायला लागले. अनेक गावांचा पाणीपुरवठा यामुळे ठप्प झाला तर, काही गावातील स्मशानभूमीपर्यंत जाणारे मार्गही बंद झाले.

अशाच एका दवडीपार क्षेत्रांमधील शेतावर जाणारा एकमेव रस्ता या पाण्याखाली आला आङे. संपूर्ण पावसाळाभर या शेतकऱ्यांनी याच पाण्यातून जाऊन आपली शेतीची कामं केली. मात्र, आता धान कापणीला आलेला आहे. त्यामुळे शेतापर्यंत ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामुग्री नेण्यासाठी त्या शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे चिंतेत पडलेल्या शेतकऱ्यांनी याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. मात्र, त्यावर कोणीही लक्ष दिले नाही. शेवटी परिसरातील जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर 244.300 मीटर असलेली पाण्याची पातळी कमी करण्यात आली. या पाण्यामुळे बाधित झालेल्या रस्त्यावर गावकरी तात्पुरत्या रस्त्याची निर्मिती करत आहेत. दवडीपारसारखी परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यातील विविध भागात आहे. त्यामुळे गोसे धरणाच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या आवश्यक असलेल्या शेती, पाणीपुरवठा आणि स्मशानभूमी याकडे जाणाऱ्या मार्गांचे पहिले पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, गावचे पुर्नवसन पूर्ण करावे आणि नंतरच पाण्याची पातळी 245 पर्यंत वाढवावी, अशी मागणी या क्षेत्रातील शेतकरी आणि गावकरी करत आहेत.

हेही वाचा - ब्रिटनच्या राजकुमाराने लहानग्यांसह साजरा केला वाढदिवस; प्रिन्स चार्ल्स यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस

अशा नियोजनशून्य पद्धतीमुळे गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची होत असलेली नुकसान भरपाई अधिकाऱ्यांकडून घेऊन त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी केली आहे.

Intro:Anc : सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गोसे धरणाची पातळी 245 मीटर ने गाठण्याची यावर्षीचे उद्देशही शक्य होताना दिसत नाही आहे. कारण 244. 300 मीटर वर पाण्याची पातळी येताच जिल्ह्याच्या बऱ्याच अशा ठिकाणी पाणी शिरले आहे जो बाधित क्षेत्र नाही आहे त्यामुळे, गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी याचा विरोध केल्याने अधिकाऱ्यांनी 245 मीटर ची पातळी गाठण्याचा ध्येय बाजूला ठेवलेला आहे. अधिकाऱ्यांचे चुकलेल्या नियोजनामुळे पाण्याच्या पातळीचा फटका अ बाधित क्षेत्राला बसत आहे असल्याने अश्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी क्षेत्रातील लोक करत आहेत.

Body:गोसे धरणाची शेवटची पाणी पातळीही 245.500 मीटर एवढी आहे यावर्षी 245 मीटर पर्यंत पाणीपातळी वाढविण्याचे नियोजन गोसे अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र अजूनही भंडारा जिल्ह्याच्या दोन गावांचे पुनर्वसन झालेले नाही तसेच नागपूर मधल्या एका गावाचे पुनर्वसन झालेले नाही त्यातच 244 च्या नंतर पाण्याची पातळी वाढविताच बुडीत क्षेत्र नसलेल्या बऱ्याच क्षेत्रात पाणी शिरायला लागले, बऱ्याच गावाचे पाणीपुरवठा यामुळे बाधित झाले तर काही गावातील समशानभूमी पर्यंत जाणारे मार्गही बंद झाले.
अशाच एका दवडीपार क्षेत्रांमधील गावकऱ्यांचे शेतीवर जाणारा एकमेव रस्ता या पाण्याखाली आला संपूर्ण पावसाळाभर या शेतकऱ्यांनी याच पाण्यातून जाऊन आपली शेतीची वहिवाट केली मात्र आता धान कापणी ला आलेला आहे त्यामुळे शेती पर्यंत ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामुग्री नेण्यासाठी त्या शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे त्यामुळे चिंतेत पडलेल्या शेतकऱ्यांनी याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली मात्र त्यावर कोणीही लक्ष दिले नाही शेवटी परिसरातील जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर 244.300 मिटर असलेले पाण्याची पातळी कमी करणे सुरू झाली या पाण्यामुळे बाधित झालेल्या रस्त्यावर गावकरी चंदा एकत्रित करून तात्पुरता रस्त्याची निर्मिती करीत आहेत दवडीपार सारखी परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यातील विविध भागात आहे त्यामुळे गोसे धरणाच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या आवश्यक असलेल्या शेती, पाणीपुरवठा आणि समशानभूमी या कडे जाणाऱ्या मार्गांचे पहिले पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, गावचे पुर्नवसन पूर्ण करावे आणि नंतरच पाण्याची पातळी 245 पर्यंत वाढवावी अशी मागणी या क्षेत्रातील शेतकरी आणि गावकरी करीत आहेत.
अशा नियोजनशून्य पद्धतीमुळे गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा होत असलेल्या नुकसान भरपाई अधिकाऱ्यांकडून घेऊन यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावे आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी केली आहे.
बाईट : यशवंत सोनकुसरे, जिल्हा परिषद सदस्य,
श्रावनेश्वर खंगार, शेतकरी, दवडीपार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.