ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात आढळले स्वाईन फ्लूचे रुग्ण; अशी घ्या काळजी - health

भंडारा जिल्ह्यांमध्ये जानेवारी २०१९ पासून स्वाइन फ्लूचे ४ रुग्ण आढळून आले होते, यापैकी एकाचा मृत्यू झाला असून उर्वरित तिघांना औषधोपचारांनी बरे करण्यात आले. यानंतर या स्वाइन-फ्लूच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.

भंडारा
author img

By

Published : Mar 1, 2019, 7:28 PM IST

भंडारा - जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. भंडारा आणि तुमसर येथे विशेष तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जीवनरक्षक प्रणाली असलेले २ विशेष वार्ड निर्माण करण्यात असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनीता बडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

भंडारा

भंडारा जिल्ह्यांमध्ये जानेवारी २०१९ पासून स्वाइन फ्लूचे ४ रुग्ण आढळून आले होते, यापैकी एकाचा मृत्यू झाला असून उर्वरित तिघांना औषधोपचारांनी बरे करण्यात आले. यानंतर या स्वाइन-फ्लूच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक उपचार केंद्रांना सतर्क राहण्याची आणि संशयित रुग्ण आल्यास त्याची योग्य ती तपासणी करून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

स्वाईन फ्लूच्या रुग्णाची लक्षणे -
ताप, घसादुखी, खोकला, खवखव, अंगदुखी, नाक गळणे, डोकेदुखी अशी लक्षणे स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्ण आढळून येतात, अशा पद्धतीचे लक्षणे आढळून आल्यास दुर्लक्ष न करता किंवा मेडिकल स्टोरमधून सर्दी खोकल्याचे औषध न घेता डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
तपासणीदरम्यान एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्या थुंकीचे नमुने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासले जातात. एच १ एन १ हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो, यामध्ये ५ वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हृदयरोग, मधुमेह, यकृत, फुप्फुस, मुत्रपिंड हे आजार असणाऱ्या व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती, प्रतिकार शक्तीचा ऱ्हास झालेली व्यक्ती, अशांना हा आजार लवकर होऊ शकतो.
स्वाईन फ्लूला प्रतिबंधक करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे, नागरिकांनी घाबरून न जाता आजाराला टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावे, पौष्टीक आहार घ्यावा, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा, धूम्रपान टाळावे, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे तसेच हस्तांदोलन टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका आणि अशा रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, अशा पद्धतीने काळजी घेऊन आपण स्वाईन फ्लूच्या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. याविषयीची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीत विविध माध्यमातून माहिती दिली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके आणि निवासी आरोग्य अधिकारी सुनीता बढे यांनी सांगितले.

undefined

Intro:ANC : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे भंडारा आणि तुमसर येथे विशेष तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे तर जिल्हा सामान्य रुग्णालयात जीवनरक्षक प्रणाली असलेले 2 विशेष वार्ड निर्माण करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनीता बडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

Body:भंडारा जिल्ह्यांमध्ये जानेवारी 2019 पासून स्वाइन फ्लूचे चार रुग्ण आढळून आले होते यापैकी एकाचा मृत्यू झाला असून उर्वरित तिघांना औषधोपचारांनी बरे करण्यात आले. यानंतर या स्वाइन-फ्लूच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक उपचार केंद्रांना सतर्क राहण्याची आणि संशयित रुग्ण आल्यास त्याची योग्य ती तपासणी करून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
स्वाईन फ्लू ची रुग्णाची लक्षणे:
ताप, घसादुखी, खोकला, खवखव, अंगदुखी, नाक गळणे, डोकेदुखी अशी लक्षणे स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्ण आढळून येतात अशा पद्धतीचे लक्षणे आढळून आल्यास दुर्लक्ष न करता किंवा मेडिकल स्टोर मधून सर्दी खोकल्याचे औषध न घेता डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
तपासणीदरम्यान एखादा रुग्ण आढळल्यास त्याचे स्वब नमुने
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासली जातात.
ए एच 1 एन 1 हा आजार अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो, यामध्ये पाच वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हृदय रोग, मधुमेह, यकृत, फुप्फुस, मूत्रपिंड यांच्या आजार असणाऱ्या व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती, प्रतिमार शक्तीचा रास झालेली व्यक्ती, दीर्घकाळ रिस्टरॉई औषध घेणारी व्यक्ती, यांना हा आजार लवकर होऊ शकतो.

स्वाइन फ्लूला प्रतिबंधक करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आव्हान आरोग्य विभागाने केले आहे नागरिकांनी घाबरून न जाता आजाराला टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाणी हात धुवावे, पौष्टीक आहार घ्यावा, लिंबू ,आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा, धूम्रपान टाळावे, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावे , भरपूर पाणी प्यावे तसेच हस्तांदोलन टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका आणि अशा रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका अशा पद्धतीने काळजी घेऊन आपण स्वाइन फ्लूच्या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. याविषयीची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीत विविध माध्यमातून माहिती दिली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके आणि निवासी आरोग्य अधिकारी सुनीता बढे यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.