ETV Bharat / state

Suicide of Loving Couple : साकोली तालुक्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या - Sakoli Police Station

साकोली तालुक्यातील एका मुलीचे आणि मुलाचे प्रेम प्रकरण सुरू होते. दोघेही एकाच महाविद्यालयात वर्ग बारावीत शिकत होते. काल शनिवारी सकाळी एका शेतकऱ्याला या प्रेमीयुगुलाचे गळफास घेतलेल्या ( Suicide of Loving Couple ) अवस्थेत मृतदेह आढळले.

Sakoli police station
साकोली पोलीस स्टेशन
author img

By

Published : Dec 5, 2021, 1:40 PM IST

भंडारा - एकाच झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आत्महत्या ( Suicide of Loving Couple ) केल्याची धक्कादायक घटना साकोली तालुक्यातील ( Sakoli Taluka ) एका गावात घडली आहे. शेतात जात असताना एका शेतकऱ्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघेही आढळून आल्याने घडना उघडकीस आली. मृत्यूचे कारण अस्पष्ट असले तरी प्रेम प्रकरणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे दोघांचेही मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने आत्महत्या की हत्या, असा संशयही बळावला आहे.

हत्या की आत्महत्या?

साकोली तालुक्यातील एका मुलीचे आणि मुलाचे प्रेम प्रकरण सुरू होते. दोघेही एकाच महाविद्यालयात वर्ग बारावीत शिकत होते. काल शनिवारी सकाळी एका शेतकऱ्याला या प्रेमीयुगुलाचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. यासंदर्भात साकोली पोलिसांना ( Sakoli Police ) माहिती समजताच घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांना याठिकाणी कोणतीही सुसाईड नोट ( Suicide Note ) आढळून आली नाही. तसेच अगदी छोट्याशा दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, दोघांचेही पाय जमिनीला चिटकून होते. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करून गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवण्यात आले, याविषयीचा संशय बळावला आहे. यासंदर्भात पोलिसांनी अधिकची माहिती दिली नसून तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.