ETV Bharat / state

Son in Law Murder Father in Law : शुल्लक कारणावरून जावयाने सासर्‍याला ढकलले कालव्यात, दोघांचा मृत्यू

सासऱ्याबरोबर झालेल्या शुल्लक वादातून जावयाने सासऱ्याला पुलावरून गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात ढकलून दिल्याने सासऱ्याचा मृत्यू ( Son in Law Murder Father in Law in bhandara ) झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली. त्यांचा मृतदेह काढण्यासाठी कालव्यात उतरलेल्या लहान भावाचा सुद्धा यात मृत्यू झाला आहे. हरी गोविंदा नागपुरे (65) व चंद्रभान गोविंदा नागपुरे (55) असे मृतक भावाचे नाव आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने गावात शोकाकुल वातावरण आहे.

Son in Law Murder Father in Law
शुल्लक कारणावरून जावयाने सासर्‍याला ढकलले कालव्यात
author img

By

Published : May 3, 2022, 11:52 AM IST

भंडारा - सासऱ्याबरोबर झालेल्या शुल्लक वादातून जावयाने सासऱ्याला पुलावरून गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात ढकलून दिले. यात त्यांचा मृत्यू ( Son in Law Murder Father in Law in bhandara ) झाला. असून मृतदेह काढण्यासाठी कालव्यात उतरलेल्या मृताच्या लहान भावाचा सुद्धा मृत्यू झाला आहे. हरी गोविंदा नागपुरे (65) व चंद्रभान गोविंदा नागपुरे (55) असे मृतक भावाचे नाव आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने गावात शोकाकुल वातावरण आहे. या घटनेतील आरोपी जावयाला पोलिसांनी अटक केली आहे.

लग्न समारंभासाठी गेले होते बाहेर गावी - पवनी तालुक्यातील सिंधी येथील रहिवाशी हरी गोविंदा नागपुरे हे नातवाईकाकडे लग्न असल्याने वाही येथे गेले होते. लग्न आटपून गावी परत जात असताना हरी यांच्या जावयाने सासर्‍याला गावी सोडून देतो म्हटले. त्यामुळे हरी हे त्यांचा जावई आरोपी अनिल हटवार यांच्या दुचाकीवर बसून निघाले. पवनी ते वही हे अंतर केवळ पाच किलोमीटर एवढे कमी आहे. मात्र अनिल आणि सासरे हरी यांचे वाटेत भांडण सुरू झाले. भांडण सुरू असतानाच काही वेळातच हे दोघेही पवनी लगत असलेल्या गोसे धरणाचा उजवा कालवा जवळ पोहोचले. कालव्याच्या पुलावर येतात अनिल याने त्यांच्या सासर्‍याला पुलावरून गोसे धरणाच्या कालव्यामध्ये ढकलून दिले. असे नातेवाईकांनी सांगितले.

जावयाने सासर्‍याला ढकलले कालव्यात, दोघांचा मृत्यू

दुसऱ्या दिवशी घटना उघड - हरी घरी परत न आल्याने जावायाला कुटुंबाने याविषयी विचारपुस सुरु केली. जावायाला सुरुवातीला टाळाटाळ केली मात्र नंतर त्याने सासर्‍याला कालवे ढकलून दिल्याचे सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी कालव्यामध्ये शोध सुरू करण्यात आला.

मृतदेह काढण्यासाठी गेलेल्या हरीच्या भावाचाही मृत्यू - हरी यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू असताना लहान भाऊ चंद्रभान याने त्याचे प्रेत बाहेर काढतो असे म्हणून कालव्यात उडी घेतली. मात्र कालव्यातील पाण्याचा त्याला अंदाज न आल्याने त्याचाही कालव्यात बुडून मृत्यु झाला. पोलिसांनी दोन्ही प्रेत कालव्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. विशेष म्हणजे आरोपी जावायाने सासऱ्यास का कालव्यात फेकले, तेव्हा नेमक्या कोणत्या कारणावरून भांडण झाले हे अजूनही स्पष्ट झाले नाही. आरोपी जावई अनिल नारायण हटवार यास पवनी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

हेही वाचा - Chardham Yatra Begins : चारधाम यात्रा आजपासून सुरू, गंगोत्री, यमुनोत्री धामाचे दरवाजे उघडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.