भंडारा- शहरातील प्रसिद्ध शितला माता मंदिर भक्तांसाठी बंद असल्याने भक्तांना मंदिरांच्या बाहेरूनच प्रार्थना करून परत जावे लागत आहे. देवीची पूजा करण्यासाठी ठराविक लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत असल्याने इतर भक्तांच्या नवरात्रीच्या उत्सवावर विरजण पडले आहे.
आजपासुन नवरात्रौत्सवाला सुरवात झाली आहे. हा सण उत्साहाचा, भक्त्तीचा आणि आनंद साजरा करण्याचा सण म्हणून संपूर्ण देश्यात साजरा केला जातो. मात्र कोरोनाच्या सावटाखाली या उत्सवावर विर्जन पडले आहे. जिल्ह्यत काही मंदिरात भक्तांच्या सकाळ पासून रांगा लागतात. या पैकी एक शीतल माता मंदिर आहे. दरवर्षी शीतला माता मंदिरामध्ये नऊ दिवस भक्तांची मोठी रेलचेल असते, पहाटे पासून रात्रीपर्यंत देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांब लांब रांगा पाहायला मिळत होते. देवीसमोर नवस बोलणारे शेकडो भक्त घट ठेवायचे. त्यामुळे कधी 500 तर कधी 1000 घट मंदिर परिसरात पाहायला मिळायचे. मंदिर परिसरात पूजेचे समान विकणारे आणि इतर ही साहित्य विकणाऱ्या लोकांनाची दुकाने मोठ्या प्रमाणात राहायची. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी या परिसरातील वाहतूक नऊ दिवस बंद ठेवण्यात येत होती; मात्र या वर्षी कोरोनामुळे सर्व थांबले आहे. मंदिर सकाळ पासूनच भक्तांसाठी बंद आहे. परिसरात कोणतेही दुकाने नाहीत. केवळ मंदिराचे पुजारी, मंदिराचे विश्वस्त यांनी सकाळी जाऊन मातेचे पूजा अर्चना केली आणि त्या नंतर मंदिराचे बाहेरील गेट बंद करून पोलिसांची तैनाती केली गेली. आता भक्त येतात मंदिराच्या गेट समोर उभेराहून प्रार्थना करतात आणि निघून जातात.
मार्च महिण्यापासून सुरू झालेला कोरोनामुळे या वर्षी बऱ्याच सणांना नागरिकांना मुकावे लागले आहे. महाराष्ट्र शासनाने अजून तरी मंदिरे उघडली नसून दिवाळी नंतर तरी मंदिरे उघडल्या जातील, अशी अपेक्षा भक्तगण करीत आहेत.