ETV Bharat / state

मोहाघाटाच्या जंगलात अज्ञात वाहनाची स्कूटीला धडक, उपचारादरम्यान विवाहिता व तिच्या ननदेचा मृत्यू - Mohaghat Jungle Accident Suruchi Mallewar Death

अज्ञात वाहनाने स्कूटीला धडक दिली. या घटनेत जखमी झालेल्या वहिनी आणि ननदेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगल परिसरात घडली.

Mohaghat Jungle Accident Suruchi Mallewar Death
मोहाघाट जंगल दुचाकी अपघात
author img

By

Published : Apr 5, 2022, 10:42 AM IST

भंडारा - अज्ञात वाहनाने स्कूटीला धडक दिली. या घटनेत जखमी झालेल्या वहिनी आणि ननदेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगल परिसरात घडली. सुरुची रवींद्र मल्लेवार (वय 26) ननद असून सोनाली सांगीडवार (वय 28) ही तिची वहिनी आहे. या दोघी स्कूटीने साकोलीकडे येताना अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.

अपघात झालेल्या स्कूटीचे दृष्य आणि व्यक्ती

हेही वाचा - Bicycle Parade : भंडाऱ्यात भव्य सायकल परेड; 2450 सायकलस्वारांनी घेतला सहभाग

सोमवारी दुपारच्या सुमारास या दोघी दुचाकी एमएच. 36 एच. 4235 ने लाखनीवरून साकोलीकडे जात होते. मोहघाट जंगलाच्या शिवारात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात सुरुची मल्लेवार हिचा पूर्णपणे खांदा तुटला आणि दोन्ही पायाला खूप गंभीर मार लागला. तर, सोनाली सांगीडवार यांच्या दोन्ही पायाला खूप गंभीर मार लागला होता.

या दोघींनाही साकोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सोनाली यांचा मृत्यू झाला, तर अतिशय गंभीर असल्यामुळे सुरुची मल्लेवार हिला भंडारा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सुरुचीचा सुद्धा मृत्यू झाला. सुरुची मल्लेवार वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सुरुची यांच्या वडिलांचा तीन महिन्याआधीच मृत्यू झाला होता. सोनाली यांना अडीच वर्षांची मुलगी असून त्यांच्या मृत्यूमुळे ती त्यांच्या प्रेमापासून वंचित राहणार आहे. सुरुची ही तिच्या आईला गोंडउमरी पीएससी येथे भेटायला जात होती. मात्र, मोहघाटा जंगलामध्ये ही घटना घडली. साकोली पोलीस फरार वाहनाचा शोध घेत आहे.

हेही वाचा - Special Birthday Celebration : दीड तासात 2250 दंड बैठका घालून केला 50 वा वाढदिवस साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.