ETV Bharat / state

सीबीएससी शाळेच्या भोंगळ कारभाराविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू - सीबीएससी शाळेच्या कारभाराविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

जिल्हातील सीबीएससी शाळेच्या व्यवस्थापनातील भोंगळ कारभाराविरोधात सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात शिक्षा बचाओ आंदोलन समितीतर्फे सत्याग्रह आंदोलन जिल्हापरिषदेच्या समोर सुरू करण्यात आले आहे.

भंडारा
भंडारा
author img

By

Published : Dec 19, 2020, 9:54 PM IST

भंडारा - जिल्हातील सीबीएससी शाळेच्या व्यवस्थापनातील भोंगळ कारभाराविरोधात सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात शिक्षा बचाओ आंदोलन समितीतर्फे सत्याग्रह आंदोलन जिल्हा परिषदेच्या समोर सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

भंडारा

नियमानुसार मुख्याध्यापक आणि शिक्षकांची नियुक्ती नाही
सीबीएससी शाळा या पूर्णतः खासगी विनाअनुदानित असतात. मात्र, तरीही शाळा चालविण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे या शाळेच्या व्यवस्थापक मंडळांना बंधनकारक असते. मात्र, असे असले तरी भंडारा जिल्ह्यात ज्या शाळा सध्या सुरू आहे या शाळांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नाही, असा आरोप उपोषण करणाऱ्या पालकांनी केला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार सुरू असून बऱ्याच शाळेमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती नियमानुसार केली गेली नाही. भंडारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेतील मुख्याध्यापक हे अवैध ठरविले आहे. मात्र, याच अवैध मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या मुलांच्या टीसीवर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या टीसी व त्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याच्या आरोप सत्याग्रह आंदोलन करणाऱ्या पालकांनी केले आहे.
अजूनही बऱ्याच मागण्यांसाठी या अगोदरही झाले होते आंदोलन
जिल्ह्यातील सीबीएससी शाळा या एनसीइआरटी निर्मीत पुस्तकांचा वापर करीत नाही. शाळा व्यवस्थापन महागडी पुस्तके विद्यार्थ्यांना शाळेतून विक्री करतात. विद्यार्थ्यांचे गणवेश हेसुद्धा शाळेतून विकले जातात शाळेत नेमलेल्या शिक्षीका या डीएड किंवा बीएड झालेल्या नसतात, असे अनेक आरोप या अगोदरही ही या शाळेवर करीत या पालकांनी या सर्व गोष्टींचा विरोध करीत वेगवेगळे आंदोलन केले होते.
खासदारांच्या शाळेचाही समावेश
सत्याग्रह आंदोलन करणाऱ्या पालकांच्या मते भंडारा जिल्ह्यातील स्प्रिंग डेल शाळा, सेंट पीटर शाळा, रॉयल पब्लिक शाळा, महर्षी विद्यालय, एसएनएस स्कूल, युएसए स्कूल अशा मोठ्या शाळांचाही समावेश आहे. यामध्ये स्प्रिंग डेलही शाळा भंडारा- गोंदिया चे खासदार सुनील मेंढे यांची आहे. आंदोलनकर्त्यांनी याअगोदर सुनील मुंडे यांना सुद्धा निवेदन दिले होते. मात्र, सुनील मेंढे यांच्या तर्फे त्यांना समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे त्यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. या सर्व बेकायदेशीर शाळेवर शासन कार्यवाही करत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे सत्याग्रह असाच सुरू राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.